सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शिंदे-फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मा रिर्टन्स! नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती सुषमा अंधारे थेट बोलल्या
  • आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
  • 'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
  • दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा,
  • उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
 जिल्हा

बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! कुत्र्याच्या भुंकण्याने घाबरलेल्या चिमुकलीचा गरम दूध अंगावर पडून मृत्यू

डिजिटल पुणे    24-10-2026 12:21:51

बीड : बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरासमोर खेळत असताना कुत्रा भुंकल्याने घाबरून घरात पळालेल्या अवघ्या तीन वर्षांच्या दुर्गाचा चुलीवरील गरम दूध अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, चिमुकलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली येथे दुर्गा ही तीन वर्षांची चिमुकली घरासमोर खेळत होती. याचवेळी एक कुत्रा तिच्या दिशेने भुंकत आल्याने ती घाबरली आणि जीवाच्या आकांताने घरात पळाली. मात्र, घराच्या अंगणात चुलीवर तापवण्यासाठी ठेवलेल्या दुधाच्या पातेल्याला तिचा धक्का लागला. त्यामुळे गरम दुधाने भरलेले पातेले तिच्या अंगावर पडले आणि ती गंभीररीत्या भाजली.

या घटनेनंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने दुर्गाची प्राणज्योत मालवली. अवघ्या तीन वर्षांच्या बालिकेचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दसऱ्याला साजरा केला वाढदिवस; काही दिवसांतच काळाचा घाला

दुर्गाच्या कुटुंबासाठी हा आघात असह्य ठरला आहे. दसऱ्याच्या दिवशीच तिचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण असताना काही दिवसांतच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.

विशेष म्हणजे, वाढदिवसाच्या दिवशी दुर्गाने मोठी झाल्यावर डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. आपल्या लाडक्या लेकीच्या भविष्याबाबत अनेक स्वप्ने पाहणाऱ्या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.एका क्षणाच्या घडामोडीने तीन वर्षांच्या चिमुकलीचा जीव गेल्याने नांदूर हवेली गावात हळहळ व्यक्त होत आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरातील नागरिकही शोकाकुल झाले आहेत.


 Give Feedback



 जाहिराती