पुणे : सिंहगड रोडवरील धायरी फाटा येथील भारती बँकेसमोरील रस्त्यावर खचलेल्या चेंबरमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या चेंबरमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता, स्थानिक नगरसेविका कोमल नवले यांनी दुरुस्तीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांतून संबंधित चेंबरच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले आहे.
रस्त्यावर चेंबर खचल्यामुळे दुचाकीस्वारांना विशेषतः धोका निर्माण होऊ शकत होता. तसेच रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता होती. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची सुलभता लक्षात घेऊन चेंबरची दुरुस्ती करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य अपघात टाळता यावेत, यासाठी रस्त्यावरील अशा धोकादायक ठिकाणांची वेळीच दुरुस्ती होणे आवश्यक आहे.