सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रे मुख्यमंत्री म्हणजे देव झाले का, ते म्हणतात ते सगळेच बरोबर कसे? कर्जतमधील वृक्षतोडीवरुन संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
 शहर

'ज्योतिषज्ञान' दिवाळी अंकाचे प्रकाशन

डिजिटल पुणे    26-10-2026 11:15:01

पुणे : सिद्धेश्वर मारटकर संपादित ' ज्योतिष ज्ञान ' दिवाळी अंकाचे प्रकाशन रविवारी झाले. रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६  रोजी प्रेसिडेंट हॉटेल, कर्वे रस्ता येथे गौरी कैलास ज्योतिष संस्थेच्या एकदिवसीय ज्योतिष संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी दिवाळी अंकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात  पार पडले .यावेळी प्रवचनकार गुरुश्री प्रिया मालवणकर,अतुलशास्त्री भगरे गुरुजी,ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार,विजय जकातदार,सौ.पल्लवी चौहान ,कैलास केंजळे, गौरी केंजळे,विजय जकातदार,लाल किताब महागुरु कुँवरजी,कांतिलाल मुनोत,चंद्रकांत शेवाळे,सौ.पुष्पलता शेवाळे,प्रदीप पंडित,डॉ.सीमा गाडेकर उपस्थित होते. 

२०२६-२७ च्या ज्योतिष ज्ञान दिवाळी अंकात नवीन वर्षातील सामाजिक,राजकीय,प्रादेशिक,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय घडामोडी ,हवामान पर्जन्यमान,शेअर मार्केट विषयक भाकिते तसेच वार्षिक राशिभविष्य ,प्रमुख राजकीय व्यक्ती साठी आगामी काळ,उपाय ,उपासना ,विवाह,नोकरी व्यवसाय,धनयोग, राजयोग इत्यादी महत्वाच्या विषयांवर विविध मान्यवरांच्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे .ज्योतिष ज्ञान दिवाळी अंकाचे हे २७ वे वर्ष असून ज्योतिष अभ्यासकांसह सामान्य वाचकांना उपयुक्त असा व संग्रही ठेवावा असा दिवाळी अंक असून अचूक भकितांसाठी प्रसिद्ध अशा दिवाळी अंकाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.अशी माहिती अंकाचे संपादक सिद्धेश्वर मारटकर यांनी दिली आहे.अंक सर्वत्र उपलब्ध असून ३३४ पानी अंकाची किंमत फक्त ३५०/- अशी माफक ठेवण्यात आली आहे.ज्योतिष ज्ञान दिवाळी अंकासाठी संपर्क-सिद्धेश्वर मारटकर 9822092234


 Give Feedback



 जाहिराती