सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रे मुख्यमंत्री म्हणजे देव झाले का, ते म्हणतात ते सगळेच बरोबर कसे? कर्जतमधील वृक्षतोडीवरुन संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
 शहर

पुण्यात पाचवा ज्ञानवर्धक ज्योतिष मेळावा उत्साहात ;पारंपरिक ज्ञानाचे आधुनिक वाहक व्हावे': मेळाव्यातील सूर

डिजिटल पुणे    26-10-2026 11:20:00

पुणे : गौरीकैलास ज्योतिष संस्था, पुणे आयोजित पाचवा ज्ञानवर्धक ज्योतिष मेळावा रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी प्रेसिडेंट हॉटेल, कर्वे रस्ता येथे उत्साहात पार पडला. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत झालेल्या या मेळाव्यास ज्योतिष अभ्यासकांचा मोठा प्रतिसाद लाभला.'ज्योतिष हे आयुष्याला मार्गदर्शक,दिशादर्शक आणि समुपदेशन करणारे शास्त्र आहे.भारतीय कुटुंब व्यवस्थेला आधार देणारे आहे.या ज्योतिष विषयक पारंपरिक ज्ञानाचे आधुनिक वाहक व्हावे', असा  सूर मेळाव्यात उमटला.गौरीकैलास ज्योतिष संस्थेच्या  संस्थापक गौरी केंजळे, कैलास केंजळे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याचे हे पाचवे वर्ष होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रवचनकार गुरुश्री प्रिया मालवणकर यांच्या हस्ते झाले, तर अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार होते. स्वागताध्यक्ष म्हणून सौ. पल्लवी चौहान यांनी काम पाहिले, तर प्रास्ताविक कैलास केंजळे यांनी केले. यावेळी पंडित विजय जकातदार  लाल किताब महागुरु कुँवरजी, कांतिलाल मुनोत, चंद्रकांत शेवाळे,सौ. पुष्पलता शेवाळे, डॉ. सौ. जयश्री बेलसरे, अष्टक वर्ग महागुरु प्रदीप पंडित, सिद्धेश्वर मारटकर,डॉ. सीमा गाडेकर, वास्तुमहर्षी रमेश पलंगे उपस्थित होते. अपर्णा गोरेगावकर यांनी सुत्रसंचालन केले.

यावेळी 'कै. मनोहर केंजळे स्मृती पुरस्कार २०२६ ' हा अॅस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी (जळगाव) यांना प्रदान करण्यात आला. सिद्धेश्वर मारटकर संपादित 'ज्योतिष ज्ञान' या  दिवाळी अंकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मेळाव्यात ज्योतिष विषयक चर्चासत्रे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पुस्तक प्रकाशन आणि ज्योतिष प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. सायंकाळी समारोप सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व प्रमाणपत्र वितरण समारंभाने मेळाव्याची सांगता झाली.या मेळाव्यात भालचंद्र ज्योतिर्विद्यालय, स्मार्ट अॅस्ट्रॉलॉजर्स पुणे, वागेश्वरी ज्योतिष कार्यालय, ऑरा कन्सल्टन्सी, ज्योतिष सिंधू असोसिएट पुणे, श्री दत्तकृपा ज्योतिष कार्यालय बेळगाव-कारवार आणि अक्षया ज्योतिष केंद्र अशा अनेक नामांकित संस्थांनी सहभाग घेतला होता.

अतुलशास्त्री भगरे गुरुजी म्हणाले,' ज्योतिष विषयक ज्ञान अगाध आहे. ज्योतिषविषयक अनेक शाखांचे ज्ञान तज्ज्ञांकडून एकत्र शिकायला मिळणे हा हेतू अशा मेळाव्यातून साध्य होतो. हा ज्ञानाचा प्रवास मागील पिढीकडून पुढील पिढीकडे सुरु राहायला हवा.' डॉ.ज्योती जोशी म्हणाल्या,''ज्योतिष हे आयुष्याला मार्गदर्शक,दिशादर्शक आणि समुपदेशन करणारे शास्त्र आहे.भारतीय कुटुंब व्यवस्थेला आधार देणारे आहे.या ज्योतिष विषयक पारंपरिक ज्ञानाचे आधुनिक वाहक व्हावे'.कैलास केंजळे यांनी गौरीकैलास ज्योतिष संस्थेच्या कार्याची माहिती दिली.राज्यातील अनेक ज्योतिषी उपस्थित होते. 


 Give Feedback



 जाहिराती