सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
  • अखेर हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ३ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
  • पुण्यात मतमोजणी केंद्रावर महायुती-मविआचे कार्यकर्ते आमनेसामने; जेवणाच्या ट्रकवरून गोंधळ, मतपेट्यांच्या सीलवरही आक्षेप!
  • मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर नवे वाहतूक नियम; मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी, कार-बसमधील वेगमर्यादाही निश्चित!१ नोव्हेंबरपासून नियमांची अंमलबजावणी; कारसाठी ताशी १००, तर प्रवासी बससाठी ८० किमी वेगमर्यादा
  • पुणे पदवीधरच्या मतमोजणीपूर्वीच गोंधळ; पेन, कागद नेण्यास पोलिसांचा मज्जाव; प्रभाकर देशमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
  • पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप
 शहर

पुणे म्हाडाचा साई गॅलेक्सी घोटाळा, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चा तीव्र आंदोलनाचा इशारा

डिजिटल पुणे    27-10-2026 16:56:57

 पुणे : साई गॅलेक्सी हा अस्तित्वात नसलेला खोटा गृहप्रकल्प दाखवून खोट्या दस्तऐवजांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) च्या वतीने  देण्यात आला आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश एस सी ,एस टी  आघाडी चे प्रदेश अध्यक्ष संजय आल्हाट यांनी याबाबत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मुख्य अधिकारी आणि म्हाडा प्राधिकरणाचे उपाध्यक्ष यांना निवेदन दिले आहे.म्हाडा दक्षता व सुरक्षा विभागाच्या आदेशाचे पाच महिने पालन न केल्याबद्दल निवेदनात आक्षेप घेण्यात आला आहे.

म्हाडा प्राधिकरणाचे मुख्य दक्षता अधिकारी विनीत अग्रवाल यांनी दि. ५ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशात साई गॅलेक्सी हा अस्तित्वात नसलेला खोटा गृहप्रकल्प दाखवून खोट्या दस्तऐवजांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याचे नमूद केले आहे. पुणे मंडळाच्या तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांनी दि. ८.फेब्रुवारी २०२४ व दि. २३.ऑगस्ट २०२४ रोजी दिलेले दोन ना हरकत प्रमाणपत्रे  हे UDCPR-2020 कलम ३.८ चे उल्लंघन असून ते अनियमित आहेत आणि ते तात्काळ रद्द करावेत, असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

या आदेशानुसार गंगाधर फ्लोरेन्टिना प्रकल्पाचा विकासक मे. श्री बालाजी रियल्टी आणि द हायफन प्रकल्पाचा विकसक मे. डायनेस्टी एजीआर यांचा २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील साठा साई गॅलेक्सी या खोट्या प्रकल्पात केवळ खासगी विकासकांमधील परस्पर सामंजस्य कराराच्या आधारे स्थलांतरित करण्यात आला आहे. हा प्रकार २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील गरीब EWS/LIG लाभार्थ्यांच्या हक्कावर गदा आणणारा असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या प्रकरणी दि. ०८.०२.२०२४ व २३.०८.२०२४ चे दोन्ही ना हरकत प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करावेत, तत्कालीन मुख्य अधिकारी व संबंधित विकासकांवर गुन्हा दाखल करावा आणि पाच महिने आदेश दडपून ठेवणाऱ्या सध्याच्या पुणे मुख्य अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशा मागण्या लोक जनशक्ती पार्टीने केल्या आहेत.

सात दिवसात कारवाई न झाल्यास पुणे म्हाडा कार्यालय, आगरकर नगर येथे तीव्र धरणे आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा संजय आल्हाट, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच होम राईट्स इंडिया सोशल फाउंडेशन चे मिलिंद गायकवाड, प्रमोद राजगुरू, विजय कदम आणि दत्तात्रय राजगुरू यांनी दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती