सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
  • मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात चौकशीनंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा; एकनाथ शिंदेंना पत्र लिहून मांडली भूमिका
  • तुम्ही घरोघरी जाऊन बंडखोरांना मनवले, तरीही भाजपचा पराभव झाला, तुम्हाला ट्विटही डिलिट करावे लागले, रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं
  • राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
  • शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
 शहर

जीविधा व्याख्यानमालेत 'वन्यजीव संशोधन' विषयावर मार्गदर्शन ;वन्यजीव संशोधन होत आहे आधुनिक आणि अचूक ! : हृषिकेश करंदीकर

डिजिटल पुणे    29-10-2026 12:26:24

पुणे : 'जीविधा 'संस्थेतर्फे आयोजित १६ व्या पर्यावरण व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी वन्यजीव संशोधक हृषिकेश करंदीकर यांनी 'वन्यजीव संशोधन: काल, आज आणि उद्या' या विषयावर मार्गदर्शन केले.'शोधयात्रा - युवा संशोधकांच्या नजरेतून निसर्गाचा अनोखा प्रवास' या संकल्पनेवर आधारित ही व्याख्यानमाला २६ ते ३० ऑक्टोबर २०२६ दरम्यान इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर, म्हात्रे पूलजवळ, पुणे येथे सुरू आहे. व्याख्यानाच्या प्रारंभी जीविधाचे संस्थापक राजीव पंडित आणि वृंदा पंडित यांनी उपस्थितांचे स्वागत केले.आपल्या व्याख्यानात करंदीकर यांनी वन्यजीव संशोधनाच्या पद्धतींमध्ये काळानुरूप झालेला बदल उलगडून दाखवला. पूर्वीच्या काळी केवळ प्रत्यक्ष निरीक्षण आणि हाताने केलेल्या नोंदींवर संशोधन अवलंबून होते, तर आज कॅमेरा ट्रॅप, रेडिओ कॉलर आणि जनुकीय तंत्रज्ञानापर्यंत मोठी प्रगती झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

संशोधन क्षेत्रात खूप वेगाने बदल होत असल्याचे नमूद करताना त्यांनी सांगितले की, सध्याच्या संशोधनात स्टँडर्ड प्रोटोकॉलचा वापर केला जातो. व्हीएचएफ  ट्रॅकिंग, जीपीएस टॅग, आरएफआयडी टॅग, एआय, डिजिटायझेशन आणि सॅटेलाईट अशा आधुनिक साधनांमुळे संशोधन अधिक अचूक झाले आहे. इकोलॉजिकल रिस्टोरेशन करताना त्या परिसरात पक्ष्यांची उपस्थिती हे एक महत्त्वाचे प्रमाण मानले जाते, तसेच मुंग्यांसारख्या लहान जीवांचे अस्तित्व हे त्या परिसंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.भविष्यातील संशोधनात तंत्रज्ञानासोबतच स्थानिक समुदायांचा सहभाग आणि दोहोंमधील समतोल कसा निर्णायक ठरणार आहे, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी आनंदी कोरडे या 'वनस्पती सह्याद्रीच्या कडेकपारीतल्या' या विषयावर मार्गदर्शन करतील.ही व्याख्यानमाला निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती