सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
  • महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
  • ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
  • बद्रीनाथहून परतणाऱ्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जोशीमठजवळ कोसळले, पायलटसह सहा जणांचा मृत्यू
  • मिनाक्षी शिंदेंना दुहेरी धक्का, आधी राजीनामा द्यावा लागला, नंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी साथही सोडली, टेंभी नाक्यावर कोणीच फिरकलं नाही
  • पुण्यातील सारसबागेसमोर खळबळजनक घटना; 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
 शहर

जीविधा व्याख्यानमालेत 'संरक्षित क्षेत्राबाहेरील वन्यजीवांचे संवर्धन' विषयावर मार्गदर्शन;संरक्षित क्षेत्राबाहेरील वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न हवेत : अर्णव गंधे

डिजिटल पुणे    30-10-2026 13:55:44

पुणे : जीविधा संस्थेतर्फे आयोजित १६ व्या पर्यावरण व्याख्यानमालेच्या चौथ्या दिवशी  अभ्यासक अर्णव गंधे यांनी ''संरक्षित क्षेत्राबाहेरील वन्यजीवांचे कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून संवर्धन'' या विषयावर मार्गदर्शन केले.'शोधयात्रा - युवा संशोधकांच्या नजरेतून निसर्गाचा अनोखा प्रवास' या संकल्पनेवर आधारित ही व्याख्यानमाला २६ ते ३० ऑक्टोबर २०२६ दरम्यान इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर, म्हात्रे पुलाजवळ, पुणे येथे सुरू आहे. जीविधाचे संस्थापक राजीव पंडित आणि वृंदा पंडित यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

आपल्या व्याख्यानात गंधे  यांनी संरक्षित क्षेत्राचे प्रकार सांगितले. भारतात जंगलांचे अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प, बायोस्पिअर रिझर्व,कम्युनिटी रिझर्व असे प्रकार असतात. राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्पाचे कोअर व बफर असे भाग असतात..जंगलाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर  जैवविविधता    आहे.अभयारण्यातील वन्यजीवन जपण्याचे प्रयत्न होतात ,तसेच प्रयत्न संरक्षित क्षेत्राबाहेरील वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी झाले पाहिजेत . अशा प्रकल्पना निधी मिळायला हवा . 

पुण्याच्या टेकड्यांची आणि वन्य जीवनाची माहिती देताना ते म्हणाले ,'पुण्यात छोट्या मोठ्या अठ्ठावीस टेकड्या आहेत.पुण्यात ५३० चौरस किलोमीटर पैकी ५९ किलोमीटर भाग टेकड्यांनी व्यापल्या आहेत.अनेक पक्षी, प्राणी पुण्याच्या टेकड्यांवर आढळतात. सध्या या टेकड्या एकमेकांना कॉरिडॉर ने जोडलेल्या नाहीत.कॉरिडॉर नष्ट होत चालले आहेत .  अनधिकृत बांधकामे ,डंपिंग यामुळे टेकड्या आक्रसत चालल्या आहेत. काही ठिकाणी पूर्ण गिळंकृत झाल्या आहेत . त्यामुळे वन्य जीवांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. ,असे त्यांनी सांगितले . 

वन्य जीवन कमी होत चालले आहे. तरीही मोर ,ससा,तरस ,रानमांजर असे अनेक जीव आढळतात . काही वर्षापूर्वी चौसिंगा हरिण,कोल्हे देखील टेकड्यांवर दिसत होते.आता टेकड्या म्हणजे बेटे झाल्याने टेकडीवर राहणे आणि फिरणे वन्य जीवाना अवघड झाले आहे.दिवसा हालचाली करणे मुश्किल झाले आहे. वन्य जीव म्हणजे टेकड्या जीवंत असल्याचे लक्षण असल्याने हे जीवन जपले पाहिजे आणि टेकड्याही जपल्या पाहिजेत ,असे गंधे म्हणाले .ही व्याख्यानमाला दररोज सायंकाळी साडेसहा वाजता होत असून ती निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमींसाठी विनामूल्य खुली आहे.समारोपाच्या दिवशी शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी आनंदी कोरडे यांचे  'वनस्पती सह्याद्रीच्या कडेकपारीतल्या' या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले .

 


 Give Feedback



 जाहिराती