पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी आयोजित परिसंवाद २०२६ या उपक्रमा अंतर्गत आयोजित "कृत्रिम बुद्धिमत्ता व मानवी बुद्धिमत्ता याविषयी माझा समज" या विषयावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. यामध्ये मयुरी पांचाळ, अपूर्वा पवार, ऋतुजा घोडके, किशोर गावडे, सुरेश भाकरे आणि प्रणव भालेराव या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कृत्रिम बुद्धिमत्ता व मानवी बुद्धिमत्ता यामधील साम्य, फरक, उपयोग, मर्यादा तसेच भविष्यातील संधी या विषयावर संवादक पद्धतीने आपले विचार मांडले.
तसेच या उपक्रमा अंतर्गत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी विचार मंथन आणि भविष्यातील तंत्रज्ञान या अनुषंगाने जडणघडण कशा पद्धतीने होण्याची शक्यता आहे, तसेच कशा पद्धतीने विकसित होत आहे याचीही संपूर्ण माहिती मिळाली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संतोष मोरे, समन्वयक डॉ. सपना राणे, प्रा. विद्या किरवे आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.