पुणे - भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत गोल्डन मेमरीज प्रस्तुत 'स्वरगंध' हा सुमधुर हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे होणार आहे.या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना चैत्राली अभ्यंकर यांची असून गायन शशांक दिवेकर आणि चैत्राली अभ्यंकर यांचे असणार आहे. वाद्यवृंदामध्ये कीबोर्डवर सुभाष देशपांडे आणि तुषार दीक्षित, तबल्यावर केदार तळणीकर आणि ऑक्टोपॅडवर रोहित जाधव साथसंगत करणार आहेत.कार्यक्रमाचे निवेदन अभिजीत कुलकर्णी करणार आहेत.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा ३११ वा कार्यक्रम दिवाळी स्वर पहाट म्हणून सादर करण्यात येत आहे,सर्व रसिकांसाठी प्रवेश खुला आहे,अशी माहिती भारतीय विद्या भवन चे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.