सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
  • राज्यात दुष्काळाच्या संकटात वरुणराजाची एन्ट्री! पुणे, बारामती, इंदापुरात काल रात्रीपासून अवकाळी पावसाचा हाहाकार
 राज्य

महाराष्ट्राला केंद्राच्या अतिरिक्त कर हस्तांतरणातून ७ हजार २२ कोटींचा निधी

डिजिटल पुणे    02-11-2026 10:40:54

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने राज्यांना कर हस्तांतरणाचा अतिरिक्त हप्ता जारी केला असून, त्याअंतर्गत महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी देशातील सर्व राज्यांना एकूण १ लाख ९ हजार १९ कोटी रुपयांचे कर हस्तांतरण करण्यात आले आहे.

नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त चालू आर्थिक वर्षात देण्यात आलेला हा दुसरा अतिरिक्त हप्ता आहे. या निधीमुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्प, विकासकामे आणि विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीला आर्थिक बळ मिळणार आहे. तसेच भांडवली खर्चाला चालना देऊन राज्याच्या विकासात्मक प्राधान्यक्रमांनुसार निधीचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.

केंद्राकडून प्राप्त झालेल्या या अतिरिक्त निधीमुळे राज्यातील सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देणे, विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच विविध कल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यास महाराष्ट्राला मदत होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती