सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
  • राज्यात दुष्काळाच्या संकटात वरुणराजाची एन्ट्री! पुणे, बारामती, इंदापुरात काल रात्रीपासून अवकाळी पावसाचा हाहाकार
 शहर

डॉ. श्रीकांत कार्लेकर लिखित 'माझा समुद्रशोध' पुस्तकाचे ३ नोव्हेंबर रोजी प्रकाशन

डिजिटल पुणे    02-11-2026 12:02:19

पुणे : भूगोल अभ्यासक डॉ.श्रीकांत कार्लेकर यांनी लिहिलेल्या 'माझा समुद्रशोध' या पुस्तकाच्या सुधारित तिसऱ्या आवृत्तीचे  प्रकाशन मंगळवार,दि.३ नोव्हेंबर २०२६  रोजी सायंकाळी साडेसहा वाजता इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र,राजेंद्र नगर,सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्क समोर, म्हात्रे पुलाजवळ, पुणे येथे  होणार आहे.या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक ,वनस्पतीशास्त्र अभ्यासक  प्रा.प्र.के.घाणेकर यांच्या हस्ते होईल.त्यानंतर प्रा.घाणेकर यांचे 'समुद्र किनाऱ्यावरील गड किल्ले आणि जैवविविधता' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

डॉ.कार्लेकर हे स. प. महाविद्यालयात भूगोल विभाग प्रमुख होते. कोकण किनारपट्टीवर संशोधन करताना त्यांना आलेले अनुभव आणि तिथे दिसणारी भूरूपे याबद्दल त्यांनी या पुस्तकात सोप्या भाषेत माहिती दिली आहे. हे पुस्तक डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. 'जीविधा 'संस्थेने प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .


 Give Feedback



 जाहिराती