सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
  • दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश
 शहर

पुणे म्हाडाचा साई गॅलेक्सी भ्रष्टाचार; लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे ५ रोजी तीव्र आंदोलन

डिजिटल पुणे    03-11-2026 13:54:59

पुणे : साई गॅलेक्सी हा अस्तित्वात नसलेला खोटा गृहप्रकल्प दाखवून खोट्या दस्तऐवजांच्या आधारे म्हाडाकडून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई न झाल्याने दि.५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता पुणे म्हाडा कार्यालय, आगरकर नगर, पुणे येथे होणाऱ्या धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) महाराष्ट्र प्रदेश एससी/एसटी सेलचे अध्यक्ष संजय आल्हाट यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

म्हाडा प्राधिकरणाचे मुख्य दक्षता अधिकारी विनीत अग्रवाल यांनी दि. ५ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशात साई गॅलेक्सी हा खोटा प्रकल्प दाखवून शासनाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. पुणे मंडळाच्या तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांनी दि. ०८/०२/२०२४ व दि. २३/०८/२०२४ रोजी दिलेली दोन्ही ना हरकत प्रमाणपत्रे UDCPR-2020 कलम ३.८ चे उल्लंघन असून अनियमित आहेत आणि ती तात्काळ रद्द करावीत, असे आदेशात म्हटले आहे.

या आदेशानुसार गंगा फ्लोरेन्टिना प्रकल्पाचा विकासक मे. श्री बालाजी रियल्टी आणि द हायफन प्रकल्पाचा विकासक मे. डायनेस्टी एजीआर यांचा २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील साठा साई गॅलेक्सी या खोट्या प्रकल्पात केवळ खासगी विकासकांमधील परस्पर सामंजस्य कराराच्या आधारे स्थलांतरित करण्यात आला. हा प्रकार गरीब EWS/LIG लाभार्थ्यांच्या हक्कावर गदा आणणारा आहे, असा आरोप पक्षाने केला आहे.

या प्रकरणी दोन्ही ना हरकत प्रमाणपत्रे रद्द करावीत, तत्कालीन मुख्य अधिकारी व संबंधित विकासकांवर गुन्हा दाखल करावा आणि पाच महिने आदेश दडपून ठेवणाऱ्या सध्याच्या मुख्य अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. 


 Give Feedback



 जाहिराती