सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
  • दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश
 जिल्हा

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! दीड महिन्यांपासून बंद असलेला रायगड रोपवे पुन्हा सुरू होणार; अवघ्या ४ मिनिटांत गडावर पोहोचता येणार

डिजिटल पुणे    03-11-2026 16:33:51

महाड : रायगड किल्ल्याला भेट देण्याचे नियोजन करणाऱ्या शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या दीड महिन्यांपासून देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलेली रायगड रोपवे सेवा ३ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रायगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी पर्यटकांना सुमारे १ हजार ४०० पायऱ्या चढाव्या लागतात. हा प्रवास ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच लहान मुलांसाठी काहीसा कठीण ठरतो. मात्र, रोपवे सुविधेमुळे अवघ्या चार मिनिटांत किल्ल्यावर पोहोचणे शक्य होते. त्यामुळे पर्यटकांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

दरवर्षी पावसाळ्यानंतर रोपवेची हंगामपूर्व देखभाल, तांत्रिक दुरुस्ती आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तपासणी केली जाते. याच पार्श्वभूमीवर २१ सप्टेंबरपासून रायगड रोपवे सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. ही कामे पूर्ण झाल्यानंतर १५ नोव्हेंबरनंतर सेवा सुरू करण्याचे नियोजन होते.

मात्र, दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणीची कामे निर्धारित वेळेआधीच पूर्ण झाल्याने ३ नोव्हेंबरपासून रोपवे सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रायगड रोपवे प्रशासनाच्या वतीने राजेंद्र खातू यांनी याबाबत माहिती दिली.

रोपवे सेवा पूर्ववत झाल्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत रायगड किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच पायऱ्या चढण्याचा त्रास टाळून शिवप्रेमींना आता अवघ्या चार मिनिटांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे दर्शन घेता येणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती