सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
  • दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
  • पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
  • अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
  • पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीकला बहुमत; अमेरिकेत आता काय काय बदलणार?, निवडणुकीत चक्रावणारा निकाल
 जिल्हा

शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचा मानसशास्त्रीय वेध! जयंतराव जाधव लिखित ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

गजानन मेनकुदळे    04-11-2026 11:16:19

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व, विचार, निर्णयक्षमता, दूरदृष्टी आणि त्यांच्या असामान्य नेतृत्वगुणांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मानसशास्त्र’ या ग्रंथाचे प्रकाशन पुण्यातील बालेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

पत्रकार जयंतराव जाधव यांनी गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या अथक परिश्रम, सखोल संशोधन, अभ्यास आणि चिंतनातून हा ग्रंथ साकारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार न करता त्यांच्या व्यक्तिमत्त्वामागील मानसिकता, विचारप्रक्रिया, प्रसंगानुरूप घेतलेले निर्णय आणि नेतृत्व कौशल्य यांचा वेगळ्या अंगाने वेध घेण्याचा प्रयत्न या ग्रंथातून करण्यात आला आहे.

या प्रकाशन सोहळ्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार भीमराव अण्णा तापकीर, पत्रकार कल्याणराव अवताडे, श्रीनाथ भिमाले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा अभ्यास नव्या पिढीपर्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून पोहोचविण्याच्या उद्देशाने जयंतराव जाधव यांनी हा संशोधनात्मक लेखनप्रपंच केला आहे. दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीनंतर त्यांच्या अभ्यासाला ग्रंथाचे स्वरूप प्राप्त झाल्याने हा ग्रंथ इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि वाचकांसाठी निश्चितच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

एका वेगळ्या विषयाची निवड, संशोधनाची जोड आणि अभ्यासपूर्ण मांडणी यातून साकारलेल्या या ग्रंथाच्या प्रकाशनामुळे पत्रकार जयंतराव जाधव यांच्या साहित्यिक व संशोधनात्मक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे.


 News Feedback

Digital Pune
jayant jadhav
 04-11-2026 11:45:35

खूप छान वस्तुनिष्ठ बातमी केली. शिवाजी महाराजांच्या मानसशास्त्र या पैलूवर आपण पहिल्यांदाच लिखाण करण्याचा प्रयत्न केला आहे वाचकांना तो प्रयत्न नक्की आवडेल अशी अपेक्षा आहे जय शिवराय

 Give Feedback



 जाहिराती