सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
  • दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
  • पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
  • अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
  • पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीकला बहुमत; अमेरिकेत आता काय काय बदलणार?, निवडणुकीत चक्रावणारा निकाल
 जिल्हा

सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेत आणखी सुधारणा करा; प्रवाशांना आवश्यक सुविधा प्राधान्याने द्या! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

डिजिटल पुणे    04-11-2026 16:02:40

सोलापूर :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आवश्यक सुविधांच्या पूर्ततेवर विशेष भर द्यावा, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्री सरनाईक यांनी आज सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन तेथील स्वच्छतागृहे, पाणपोई आणि इतर प्रवासी सुविधांची पाहणी केली. बसस्थानकात झालेल्या सुधारणांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, स्वच्छतेच्या बाबतीत अद्याप सुधारणा करण्यास मोठा वाव असून, बसस्थानक परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षतेने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील प्रवाशांशी थेट संवाद साधला. एसटीच्या नवीन बसेसबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशीच दर्जेदार सेवा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी प्रवाशांनी स्थानिक समस्याही मंत्री महोदयांसमोर मांडल्या. दोन मुख्य शहरा दरम्यान विनावाहक सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली.

प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचनांची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी संबंधित एसटी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या समाधानासाठी एसटी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.प्रवाशांना उत्तम सुविधा, स्वच्छ बसस्थानके आणि समाधानकारक प्रवास अनुभव देणे हे एसटी महामंडळाचे प्राधान्य आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी स्थानिक प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती