सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
  • दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
  • पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
  • अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
  • पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीकला बहुमत; अमेरिकेत आता काय काय बदलणार?, निवडणुकीत चक्रावणारा निकाल
 राज्य

राहुल एकनाथ कराळे यांची दिल्ली विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी नियुक्ती; शांतिदूत परिवाराचे संस्थापक IPS डॉ. विठ्ठल जाधव यांचे जावई; प्रशासकीय क्षेत्रात मानाचा बहुमान

गजानन मेनकुदळे    04-11-2026 16:58:56

नवी दिल्ली  : भारतीय संरक्षण लेखा सेवा (IDAS) मधील २०११ बॅचचे वरिष्ठ अधिकारी श्री. राहुल एकनाथ कराळे यांची दिल्ली विकास प्राधिकरणाच्या (DDA) आयुक्त (कार्मिक) अर्थात Commissioner (Personnel) या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे प्रशासकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, जाधव परिवारासह शांतिदूत परिवारासाठीही ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.

श्री. राहुल एकनाथ कराळे हे शांतिदूत परिवाराचे संस्थापक तथा इंडियन पोलीस मित्र भारतचे मुख्य मार्गदर्शक निवृत्त IPS अधिकारी डॉ. विठ्ठल जाधव यांचे जावई आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय प्रशासकीय यशामुळे डॉ. विठ्ठल जाधव यांच्या परिवाराच्या आनंदात भर पडली आहे.

केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या (DoPT) आदेशानुसार, राहुल कराळे यांची केंद्रीय प्रतिनियुक्ती योजनेंतर्गत दिल्ली विकास प्राधिकरणात नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत त्यांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे.

संरक्षण लेखा, आर्थिक व्यवस्थापन आणि लेखापरीक्षण या क्षेत्रांमध्ये राहुल कराळे यांचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी संरक्षण लेखा विभागात तसेच भारतीय नौदलाचे वित्तीय सल्लागार म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. याशिवाय संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतही त्यांनी योगदान दिले असून, भारतीय निवडणूक आयोगासाठी निरीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या या व्यापक प्रशासकीय अनुभवाचा दिल्ली विकास प्राधिकरणाच्या कामकाजाला निश्चितच लाभ होणार आहे.

या नियुक्तीबद्दल डॉ. सुरेश (डी. एस.) राठोड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, शांतिदूत परिवाराचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच इंडियन पोलीस मित्र भारतचे संस्थापक डॉ. सुरेश के. राठोड यांनी IPS डॉ. विठ्ठल जाधव यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच राहुल एकनाथ कराळे यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांना पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

अनुभव, कार्यक्षमता आणि प्रशासकीय कौशल्याच्या बळावर महत्त्वपूर्ण जबाबदारी प्राप्त करणाऱ्या राहुल एकनाथ कराळे यांच्या या नियुक्तीमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि शुभचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती