सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
  • दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
  • पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
  • अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
  • पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीकला बहुमत; अमेरिकेत आता काय काय बदलणार?, निवडणुकीत चक्रावणारा निकाल
 जिल्हा

उमेद अभियानाचा ग्राहकांच्या नजरेसमोर ‘ताजा दिवाळी फराळ’ बनवण्याचा अभिनव उपक्रम

डिजिटल पुणे    04-11-2026 17:47:07

मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद अभियान) द्वारे आयोजित विशेष ‘दिवाळी फराळ महोत्सवाचा शुभारंभ अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे-पाटील यांच्या हस्ते नवी मुंबई येथे झाला.

यावेळी अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यास अभियानाचे उपसंचालक बाळासाहेब टट्टू, श्वेता पालवे, संदीप जठार तसेच तंत्र अधिकारी तथा अवर सचिव शरद गीते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 ग्राहकांच्या प्रत्यक्ष नजरेसमोर ताजा फराळ!

स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि ग्राहकांना उच्च दर्जाचा फराळ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानाने यावर्षी ‘ग्राहकांच्या समोर प्रत्यक्ष दिवाळी फराळ तयार करण्याची’ अभिनव संकल्पना राबवली आहे. यामुळे फराळाची स्वच्छता, दर्जा आणि ताजेपणाबाबत ग्राहकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांच्या थेट मालाचा वापर

या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे फराळ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळण्यासोबतच ग्राहकांनाही शुद्ध आणि कसदार पदार्थांचा आस्वाद घेता येत आहे.

स्वाद अस्सल परंपरेचा!

या महोत्सवात महिला बचतगटांनी तयार केलेली ताजी शेव, खुसखुशीत अनारसे, वेगवेगळ्या प्रकारच्या स्वादिष्ट करंज्या, चविष्ट चिवड्यांचे प्रकार तसेच अस्सल देशी तुपात तयार केलेले बेसन व रव्याचे लाडू यांसारखे पदार्थ उपलब्ध आहेत.


 Give Feedback



 जाहिराती