सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गोकुळमधील सत्तासंघर्ष पेटला; ९ नोव्हेंबरला सतेज पाटलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांनी षडयंत्र केल्याचा आरोप
  • 'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
 शहर

भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशनचा दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात ; 'स्वरगंध' गीतांच्या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डिजिटल पुणे    05-11-2026 12:49:53

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत गोल्डन मेमरीज प्रस्तुत 'स्वरगंध' हा सुमधुर हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे उत्साहात झाला.या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना चैत्राली अभ्यंकर यांची होती. गायन शशांक दिवेकर आणि चैत्राली अभ्यंकर यांनी सादर केले. वाद्यवृंदामध्ये कीबोर्डवर सुभाष देशपांडे आणि तुषार दीक्षित, तबल्यावर केदार तळणीकर आणि ऑक्टोपॅडवर रोहित जाधव यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन अभिजीत कुलकर्णी यांनी केले.

दिवाळीच्या मंगल पहाटेच्या वेळी  सुमधुर हिंदी मराठी गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा ३११ वा कार्यक्रम होता.यावेळी भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या अध्यक्षा लीना मेहेंदळे, भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे, तसेच डॉ.अ. ल. देशमुख, विवेक वेलणकर,भारतीय विद्या भवन संचालित विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी,पुणेकर रसिक  उपस्थित होते.दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.सर्वत्र रांगोळी काढून रोषणाई करण्यात आली होती. 


 Give Feedback



 जाहिराती