सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
  • खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
  • 61 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
 क्राईम

पुणे हादरलं! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले मानवी पायांचे तुकडे; सांगवी परिसरात खळबळ

डिजिटल पुणे    06-11-2026 17:17:50

पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मानवी पायांचे दोन तुकडे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय ते काटेपुरम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत कचऱ्याचा ढीग आहे. याच ठिकाणी काही नागरिकांना मानवी पायांचे तुकडे आढळून आले. या प्रकाराची माहिती मिळताच सांगवी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक अंदाजानुसार, आढळलेले पाय पुरुषाचे असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, संबंधित व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. हे अवयव नेमके कोणाचे आहेत, ते घटनास्थळी कोणी आणि कशासाठी टाकले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. परिसरातील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

शहरात मानवी अवयव आढळल्याच्या या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा तपास पुढे कोणते नवे धागेदोरे समोर आणतो आणि संबंधित व्यक्तीची ओळख कधी पटते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती