सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
  • पुण्यात दिवाळीत आगींचा भडका! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तब्बल ९४ ठिकाणी अग्नितांडव; सहा वर्षांतील सर्वाधिक घटना
  • कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
  • सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
 क्राईम

नागपुरात दिवाळीच्या रात्री थरारक हत्याकांड! फटाके फोडण्यावरून वाद; चौघांचा तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला, जागीच मृत्यू

डिजिटल पुणे    09-11-2026 18:30:01

नागपूर : दिवाळीच्या आनंदोत्सवाला नागपुरात हिंसक वळण लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहनासमोर फटाके फोडण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून चार जणांनी मिळून एका २७ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. लक्ष्मीपूजनाच्या रात्री रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवनगर चौकात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यात अमन ऊर्फ बॉबी सपाटे (वय २७, रा. हुडकेश्वर) याचा मृत्यू झाला. या प्रकरणात अक्षय मडावी (वय २८, रा. पांढराबोडी), सुजल शेडाम आणि समीर कावळे यांची नावे समोर आली आहेत. यातील अक्षय मडावी हा पोलिसांच्या नोंदीतील गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. अन्य दोन आरोपीही यापूर्वी गुन्हेगारी प्रकरणांत आरोपी असल्याचे सांगण्यात येते.

मिळालेल्या माहितीनुसार, अमनने कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर मित्र प्रसाद राऊत याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडला होता. मित्रांसोबत देवनगर चौकात फटाके फोडत असताना अक्षय मडावी तेथे आला. त्याने आपले वाहन चौकात उभे केले होते. अमन वाहनासमोर फटाके फोडत असल्याने अक्षयने त्याला विरोध केला. याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.

वादाचे रूपांतर काही वेळातच शिवीगाळ आणि संघर्षात झाले. संतापलेल्या अक्षयने आपल्या तीन साथीदारांसह अमनवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात अमन गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर चारही आरोपी तेथून फरार झाले.घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

आगीच्या घटनेत व्यस्त असताना खुनाची घटना; पोलिसांची धावपळ

लक्ष्मीपूजनाच्या रात्रीच बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरकरनगर परिसरात टीव्हीएस दुचाकीच्या शोरूमला भीषण आग लागली होती. रहिवासी परिसर असल्याने संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्याचे कामही पोलीस करत होते. या आगीच्या घटनेत पोलीस यंत्रणा व्यस्त असतानाच देवनगर चौकात मध्यरात्री हत्येची घटना घडल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.

हत्येच्या घटनेनंतर पोलीस निरीक्षकाची मुख्यालयात बदली

देवनगर चौकातील हत्येच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. पोलीस आयुक्तांनी बजाजनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण यांची मुख्यालयात बदली केली आहे. दरम्यान, पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार दुय्यम निरीक्षक शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.दिवाळीसारख्या सणाच्या रात्री किरकोळ कारणावरून घडलेल्या या हत्याकांडामुळे नागपूरमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती