सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सरकारी कार्यक्रमात मराठी कलाकारांना पाठीमागे उभं केलं जातं, हिंदी कलाकारांना डोक्यावर घेतात, ते पाहून प्रचंड राग येतो; सुबोध भावे स्पष्टच बोलले
  • मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
  • मोठी बातमी : विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
 जिल्हा

डोळ्यांच्या तिरळेपणावरील उपचारांसाठी यवतमाळात मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

डिजिटल पुणे    12-11-2026 18:36:15

यवतमाळ : तिरळेपणाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लहान मुलांपासून तरुण आणि प्रौढ नागरिकांपर्यंत सर्वांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी यवतमाळ येथे विशेष नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या ‘प्रोजेक्ट नयनतारा’, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि पुणे येथील नेत्रसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर २० ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या शिबिरांतर्गत २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ओपीडी वेळेत रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांवर २१ व २२ नोव्हेंबर रोजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून शस्त्रक्रिया करण्यात येईल. शिबिरातील तपासणी आणि शस्त्रक्रिया सीएसआरच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.

तिरळेपणाच्या समस्येवर उपचार आणि जनजागृतीसाठी नेत्रसेवा प्रतिष्ठान ही संस्था गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेच्या कार्याची नोंद तीन वेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्ससह इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. संस्थेने आतापर्यंत २५० निदान शिबिरे आणि २०३ शस्त्रक्रिया शिबिरांचे यशस्वी आयोजन केले आहे. या शिबिराचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील तिरळेपणाचा त्रास असलेल्या सर्व वयोगटांतील नागरिकांना घेता येणार आहे. विशेषतः १८ ते २५ वयोगटातील विवाह इच्छुक तरुण-तरुणी तसेच विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी केले.

तिरळेपणामुळे अनेकदा व्यक्तीचा आत्मविश्वास आणि सामाजिक वावर प्रभावित होतो. मात्र, योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास ही समस्या दूर करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत शिबिरात सहभागी होऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती