पुणे : केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ च्या निकालात पुणे शहराची प्रचंड मोठी पीछेहाट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागच्याच वर्षी देशात ८ क्रमांकावर असलेले पुणे शहर यंदा १२ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. याबाबत काँग्रेस पक्षाचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष तथा स्थायी समितीचे सदस्य प्रशांत जगताप यांनी स्थायी समितीच्या सभेत आक्रमक पवित्रा घेत त्ताधार्यांना जाब विचारला.
३५०० स्वच्छता कर्मचाऱ्यांची भरती केल्यानंतर, महानगरपालिकेच्या तिजोरीवर ३५०० कोटी रुपयांचा भार टाकल्यानंतरही पुणे शहराची झालेली ही अधोगती सत्ताधारी भाजपाच्या निष्क्रियतेचे लक्षण आहे अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली आहे. यासोबतच पुणे शहर हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. पुणे शहरातील हवा श्वास घेण्यायोग्य नाही असा निष्कर्ष ही अहवालात आला आहे. याबाबतही प्रशांत जगताप यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपाला जाब विचारला.