सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • MS धोनीची IPL मधून निवृत्ती? चेन्नई सुपर किंग्जने सोपवली नवी जबाबदारी; 2027 पासून मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार!
  • अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
  • अमित शाह यांचा चकाट्या पिटणारा गृहमंत्री असा उल्लेख, मणिपूर, अरुणाचल प्रदेशला जाण्याचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंचा शाहांवर हल्लाबोल
  • आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
 क्राईम

सांगलीतील ३३ वर्षीय तरुणाची चिपळूणमध्ये निर्घृण हत्या; डोक्यात जांभा दगड घालून संपवलं, वालोपे परिसरात खळबळ

डिजिटल पुणे    17-11-2026 18:19:24

चिपळूण : सांगली जिल्ह्यातील एका ३३ वर्षीय तरुणाची चिपळूणमधील वालोपे परिसरात निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवनाथ बबन कांबळे असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. डोक्यात जांभा दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ कांबळे हा मूळचा सांगली जिल्ह्यातील वांगी, तालुका खटाव येथील रहिवासी होता. तो सध्या चिपळूणमधील वालोपे येथे आपल्या बहिणीकडे राहत होता. सोमवारी (१६ नोव्हेंबर) रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास तो घराबाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह वालोपे येथील झुलाई जनरल स्टोअर्सच्या मागील बाजूस आढळून आला.

डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा संशय

या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली. त्यावेळी एका व्यक्तीने मृत तरुणाच्या मेहुण्याची ओळख सांगितली. त्यांना घटनास्थळी बोलावल्यानंतर त्यांनी मृतदेह नवनाथ कांबळे यांचाच असल्याचे निश्चित केले.

पोलिसांच्या प्राथमिक पाहणीत मृतदेहाजवळ जांभा दगड आढळून आला आहे. याच दगडाने डोक्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली आणि यामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाकडून तपास

चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक व्हॅन, श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास केला जात आहे.दरम्यान, नवनाथ कांबळे यांची हत्या कोणी आणि कोणत्या कारणासाठी केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

 


 Give Feedback



 जाहिराती