पुणे : आज महानगरपालिकेमध्ये चर्चेमध्ये फर्ग्युसन रोडवरील अतिक्रमणाचा विषय आला होता. त्यावेळेस सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक हे आंदोलन करताना दिसले. प्रत्यक्षात जनता तेच हप्ते घेतात असा आरोप करते आहे असे त्याच नगरसेवकांनी पण सांगितले.
दुसरीकडे या भाजपचे शहराध्यक्ष घाटे यांनी येथे बांगलादेशी लोक अतिक्रमण करीत असल्याचे सांगितले. एकीकडे सत्ताधारी पक्ष भाजपच आहे, या भागातील नगरसेवक भाजपचे आहेत आणि विधानसभेत सिद्धार्थ शिरोळे सुद्धा हा विषय उचलतात असे सांगितले जात आहे. परंतु येथे जर बांगलादेशी नागरिक अतिक्रमण करत असतील तर हा प्रश्न स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी यांना परवा पुण्यात विचारायला हवा होता. म्हणजे ट्रिपल इंजिन यांचेच असताना असे आरोप करून ते स्वतःचेच हसे करून घेत आहेत.

बीएमसीसी रोड, फर्ग्युसन रोड आपटे रोड मॉडेल कॉलनी या भागातील पुणेकर सजग आहेत. नागरिक नगरसेवकांवर हप्ते देत असल्याचा आरोप करतात असे भाजपचे स्थानिक नगरसेवक सांगत होते. दर सोमवारी अतिक्रमणाची गाडी येते आणि पुन्हा तोच खेळ चालू राहतो हे स्पष्ट आहे असे असताना भाजपचीही नौटंकी गमतीशीर होती.

दुसरीकडे ही चर्चा पालिकेत चालू असताना अतिक्रमण विभाग जागा झाला आणि फरगुशन रोडवरील फ्रंट मार्जिन साईड मार्जिन आणि फुटपाथ वर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना कारवाई होण्याचा निरोप मिळाला. तातडीने तेथील सर्व व्यावसायिकांनी आपला माल, स्टॉल हलवला आणि त्यानंतर बरोबर दोन वाजता महापालिकेच्या गाड्या फर्ग्युसन रोडवर आल्या. तोवर सर्वत्र ठीकठाक झालेले होते.त्यामुळे आज भाजपची डबल ढोलकी पण पाहायला मिळाली आणि महापालिका च्या निलाजरेपणा पण पाहायला मिळाला.
