सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
 क्राईम

पत्नीची दगडाने ठेचून हत्या; फरार पतीने शेतात पेटवली कपाशी, आगीत उडी घेत संपवले जीवन; बीडमधील धक्कादायक घटना

डिजिटल पुणे    18-11-2026 17:52:36

बीड : पत्नीच्या हत्येनंतर फरार झालेल्या पतीने स्वतःच्याच शेतात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील आनंदवाडी येथे उघडकीस आली आहे. पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्यानंतर पतीने शेतातील वाळलेल्या कपाशीच्या ढिगाला आग लावून त्यात उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुहेरी घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवसाबाई विष्णू कदम (वय ५५) यांची सोमवारी (१६ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास राहत्या घरात हत्या करण्यात आली. त्या स्वयंपाकघरात झोपल्या असताना त्यांचे पती विष्णू गणपत कदम (वय ६०) यांनी घराच्या मागील दरवाजातून प्रवेश केला. त्यानंतर झोपेत असलेल्या भिवसाबाई यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

घरातून आलेल्या आवाजामुळे भिवसाबाई यांचा मुलगा आणि सून जागे झाले. त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन पाहिले असता भिवसाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

अनैतिक संबंधांच्या वादातून टोकाचे पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू कदम यांचे अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. या वादातूनच विष्णू कदम यांनी पत्नीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

पत्नीच्या हत्येनंतर विष्णू कदम फरार झाले होते. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच मंगळवारी रात्री आणखी एक धक्कादायक घटना घडली. विष्णू कदम यांनी स्वतःच्या शेतात जाऊन वाळलेल्या कपाशीच्या ढिगाला आग लावली आणि पेटत्या आगीत उडी घेतली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.पत्नीच्या हत्येनंतर पतीनेही आत्महत्या केल्याने आनंदवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

 


 Give Feedback



 जाहिराती