सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
  • पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड; २५ मिनिटं प्रतीक्षा, अखेर प्रवासाचा प्लॅन बदलला!
  • मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
  • मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
  • अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
 राज्य

पुणेकरांच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या जागेचा पाठपुरावा…

डिजिटल पुणे    19-11-2026 11:53:01

नवी दिल्ली : पुणे शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी खडकवासला येथे प्रस्तावित २०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या (CWPRS) मालकीची सुमारे ४ हेक्टर जागा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी केंद्रीय जलशक्ती मंत्री मा.श्री. सी.आर. पाटील साहेब यांची भेट घेऊन केली. 

पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि नव्याने समाविष्ट झालेल्या १२ गावांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता, पुणे महानगरपालिकेने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नियोजन केले आहे. सुमारे ८९० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (DPR) केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने ११ मे २०२६ रोजी मंजुरी दिली आहे.

नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अलीकडे गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा बनला आहे. जलजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

प्रकल्पासाठी खडकवासला येथील CWPRS ची जागा तांत्रिकदृष्ट्या सर्वाधिक योग्य असून, जागेच्या हस्तांतरणासाठी जलशक्ती मंत्रालयाची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे या प्रस्तावाला प्राधान्याने मंजुरी देऊन प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा करावा, अशी विनंती मा. सी. आर. पाटील साहेबांना केली.पुणेकरांचे आरोग्य, सुरक्षित पिण्याचे पाणी आणि शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा, हाच यामागचा उद्देश आहे.

#Pune #WaterSupply #CleanDrinkingWater #PuneDevelopment #MurlidharMohol

 

 


 Give Feedback



 जाहिराती