सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
  • पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड; २५ मिनिटं प्रतीक्षा, अखेर प्रवासाचा प्लॅन बदलला!
  • मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
  • मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
  • अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
 विश्लेषण

दुबईत अडकलेल्या महिलेची मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून सुटका; नोकरीच्या आमिषाने महिलांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता

डिजिटल पुणे    19-11-2026 15:45:49

पुणे : नोकरीच्या आमिषाने दुबईला नेऊन चुकीचे काम करण्यासाठी दबाव टाकत डांबून ठेवलेल्या एका महिलेची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून सुखरूप सुटका झाली. परराष्ट्र मंत्रालय, दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावास आणि आयपीएफ महाहेल्पलाईनच्या मदतीने या महिलेला भारतात परत आणण्यात आले. दरम्यान, नोकरीच्या आमिषाने महिलांना परदेशात नेऊन त्यांची फसवणूक करणारी मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे पत्र त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले आहे.

संबंधित महिलेचे पती मोहोळ यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात मदत मागण्यासाठी आले होते. पत्नीला दुबईत डांबून ठेवले असून, तिचा पासपोर्टही काढून घेतल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मोहोळ यांच्या कार्यालयाने महिलेशी थेट संपर्क साधला.

कुटुंबावर कर्जाचा बोजा आणि पती दिव्यांग असल्याने संबंधित महिला नोकरीसाठी दुबईला गेली होती. व्हाट्सअप वरून संपर्कात आलेल्या एका व्यक्तीने तिला हॉटेलमध्ये नोकरी आणि दरमहा सव्वा लाख रुपये पगाराचे आमिष दाखवले होते. मात्र, दुबईत पोहोचल्यानंतर तिला देहविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तिने नकार दिल्यानंतर तिच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तिचा पासपोर्ट काढून घेऊन तिला डांबून ठेवण्यात आले.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मोहोळ यांनी तातडीने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या मदतीने महिलेच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. संयुक्त अरब अमिरातीतील महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि आयपीएफ महाहेल्पलाईनचे प्रमुख राहुल तुळपुळे यांच्याशीही संपर्क साधण्यात आला.

महिला नेमकी कुठे आहे, याची माहिती मिळवून तिच्याशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला. भारतीय वाणिज्य दूतावासाच्या मदतीने तिचा पासपोर्ट परत मिळविण्यात आला. त्यानंतर ती महिला संबंधितांच्या तावडीतून बाहेर पडली. महाहेल्पलाईनच्या सदस्यांनी तिला सुरक्षितपणे भारतीय वाणिज्य दूतावासात पोहोचवले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोहोळ यांच्या कार्यालयाने तिच्या भारत प्रवासासाठी विमान तिकिटाची व्यवस्था केली. त्यानंतर ती सुखरूप मुंबईत परतली. राहुल तुळपुळे यांच्यासह श्वेता करंदीकर, प्रसाद दातार आणि प्रसाद पाटील यांनी महिलेच्या सुटकेसाठी विशेष प्रयत्न केले.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोहोळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. नोकरीच्या आमिषाने महिलांना परदेशात पाठवून त्यांची फसवणूक आणि शोषण करणाऱ्या एजंटची मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी संबंधित सरकारी यंत्रणांच्या मदतीने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच अशा फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती