सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
  • पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड; २५ मिनिटं प्रतीक्षा, अखेर प्रवासाचा प्लॅन बदलला!
  • मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
  • मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
  • अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
 जिल्हा

राज्यातील बंदरांच्या विकासासाठी शासनाकडून सर्व सहकार्य – मंत्री नितेश राणे

डिजिटल पुणे    19-11-2026 16:40:45

मुंबई : राज्यातील बंदरांची माल हाताळणी क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते व रेल्वे कनेक्टिव्हिटी, बंदरांशी संबंधित नियामक बाबी, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासंदर्भात बंदर संचालकांनी मांडलेल्या समस्या व सूचनांची नोंद घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. राज्यातील बंदरांच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

राज्यातील लहान बंदरांची माल हाताळणी क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी राज्यातील बंदरे विभागाशी संबंधित सर्व स्टेकहोल्डर्ससोबत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बॅलार्ड इस्टेट येथील कार्यालयात बैठक झाली. यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बी, पोर्ट ऑपरेटर्स व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अंबा नदी परिसरातील बंदराची सध्याची माल हाताळणी सुमारे २५.५ दशलक्ष टन असून, चालू वर्षात ती २६ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. पोलाद प्रकल्पाची क्षमता वाढल्यानंतर प्रत्यक्ष माल हाताळणी ४३ दशलक्ष टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. वाढत्या जहाज वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर नौका मागोवा प्रणालीच्या व्याप्तीत अंबा नदीचा समावेश करण्याचा मुद्दा, अंबा नदीच्या प्रवेश कालव्याचे खोलीकरण,गॅस वाहिनीचे स्थलांतर आदी बाबींसाठी  शासन सहकार्य करेल असे मंत्री राणे यांनी सांगितले.

जयगड बंदराची एकूण क्षमता ५५ दशलक्ष टन असून, सध्या सुमारे ३५ दशलक्ष टन माल हाताळला जातो. उपलब्ध क्षमता पूर्णपणे वापरण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि पूल सुविधा विकसित करणे, कोकण रेल्वेची माल वाहतूक क्षमता वाढविणे तसेच कोकण आणि मध्य रेल्वेच्या जाळ्यांमधील जोडणी मजबूत करणे आवश्यक आहे. या पायाभूत सुविधांमुळे रत्नागिरीसह महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील उद्योग आणि रोजगाराला चालना मिळू शकते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

संलग्न उद्योग नसलेल्या बंदरांना मालवाहतुकीसाठी परिसरातील उद्योगांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि संबंधित शासकीय विभागांनी बंदर परिसरात उद्योगविकासासाठी संयुक्त नियोजन करावे, अशी सूचना प्रतिनिधींनी केली. रेल्वे साइडिंगची क्षमता वाढविणे, वीज प्रकल्पांसाठी मालवाहतूक सुरू ठेवणे तसेच कंटेनर, एलपीजी, रसायने, युरिया आणि साखर यांसारख्या व्यावसायिक मालाची हाताळणी वाढविण्याचे प्रस्तावही यावेळी मांडण्यात आले.

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती