सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
  • पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड; २५ मिनिटं प्रतीक्षा, अखेर प्रवासाचा प्लॅन बदलला!
  • मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
  • मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
  • अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
 जिल्हा

प्रभादेवीतील अतिक्रमण कारवाईला अखेर स्थगिती; एकनाथ शिंदेंनी रेल्वेमंत्र्यांना केला थेट फोन, १०२ कुटुंबांना दिलासा!

डिजिटल पुणे    20-11-2026 16:48:44

मुंबई : मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरात सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधत कारवाई थांबवण्याची मागणी केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाला पाडकाम मोहीम तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे परिसरातील १०२ रहिवाशांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवर असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पश्चिम रेल्वेकडून शुक्रवारी पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी कारवाईला तीव्र विरोध दर्शवत आंदोलन सुरू केले.

रहिवाशांचे आधी पुनर्वसन करण्यात यावे आणि त्यानंतरच बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत होती. या आंदोलनात ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांनीही सहभाग घेत रहिवाशांना पाठिंबा दिला.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी फोनवरून चर्चा केली. स्थानिक रहिवासी गेल्या ५० ते ६० वर्षांपासून या परिसरात राहत असल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा विचार केल्याशिवाय कारवाई करू नये, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाला पाडकामाची मोहीम थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

या निर्णयाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रभादेवीमध्ये रेल्वेची पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आली होती. मात्र, आता ही कारवाई थांबवण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी नागरिक गेल्या ५० ते ६० वर्षांपासून राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. यासंदर्भात आपण केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच, यापुढे रेल्वेचा बांधकाम विभाग आणि आर अँड डी विभाग एकत्रितपणे पुनर्वसनाबाबत कायमस्वरूपी धोरण तयार करणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रभादेवीतील रहिवाशांच्या डोक्यावर असलेली पाडकामाची टांगती तलवार दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर तूर्तास पाडकामाची कारवाई थांबली असली, तरी रहिवाशांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी रेल्वे प्रशासन कोणता निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती