सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
 क्राईम

हिंजवडीत प्रेमसंबंधातून तरुणीची निर्घृण हत्या; सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रियकराचा धक्कादायक प्रकार, मृतदेहाशेजारी रात्रभर बसून राहिला!

डिजिटल पुणे    24-11-2026 11:21:58

पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून झालेल्या वादाचा भयंकर शेवट झाल्याची घटना समोर आली आहे. दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून झालेल्या वादात एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने आपल्या प्रेयसीची मारहाण करून हत्या केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. त्यानंतर सोमवारी (२३ नोव्हेंबर) पहाटे स्वतः पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मृत तरुणीचे नाव कोमल राजेंद्र डहाके (वय २७, मूळ रा. वर्धा) असे असून, आरोपीचे नाव शुभम ज्ञानेश्वर काळबांडे (वय ३१, मूळ रा. सेनगाव, जि. हिंगोली) असे आहे. कोमल ही विप्रो कंपनीत, तर शुभम हा इन्फोसिस कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. दोघांची आयटी क्षेत्रात काम करताना ओळख झाली होती. त्यानंतर गेल्या साडेतीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघेही एकत्र राहत होते आणि त्यांच्या लग्नालाही कुटुंबीयांची संमती असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसऱ्या तरुणीच्या संशयावरून वारंवार वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमचे अन्य एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय कोमलला होता. याच कारणावरून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. रविवारी (२२ नोव्हेंबर) रात्री दोघेही एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते हिंजवडीतील साखरेवस्ती परिसरातील प्रिस्टाईन पीजीमध्ये कोमल राहत असलेल्या खोलीत परतले.

मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद पहाटेपर्यंत सुरूच होता. पहाटे तीनच्या सुमारास वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यावेळी शुभमने कोमलला हाताने आणि ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिचे डोके भिंतीवर आणि बेडवर आपटल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कोमलचा मृत्यू झाला.

मृतदेहाशेजारी बसून राहिला, पहाटे स्वतःच पोलिसांना फोन

कोमलचा मृत्यू झाल्यानंतरही शुभम खोलीतून बाहेर गेला नाही. तो रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. अखेर सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याने स्वतः हिंजवडी पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती देतानाच त्याने रुग्णवाहिकेची मदतही मागितली. माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कोमलला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांकडून आरोपी ताब्यात; पुढील तपास सुरू

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तपास केला. प्राथमिक चौकशी आणि उपलब्ध माहितीनुसार, कोमलला झालेल्या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी शुभम काळबांडेला ताब्यात घेतले. याप्रकरणी अक्षय दिलीपराव भोंग (वय ३४, रा. सुसगाव, ता. मुळशी, मूळ रा. यवतमाळ) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस उपायुक्त प्रदीप जाधव यांनीही या घटनेची माहिती दिली असून, हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. साडेतीन वर्षांच्या प्रेमसंबंधाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


 Give Feedback



 जाहिराती