सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
  • राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
 शहर

लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी निमित्त अभिवादन ;विचारकेंद्री राजकारणाचे श्रेय यशवंतराव चव्हाण यांना :प्रा.मिलिंद जोशी

डिजिटल पुणे    25-11-2026 15:01:40

पुणे : महाराष्ट्र राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री, लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर, पुणे केंद्र यांच्या वतीने पुष्पहार अर्पण व मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यशवंतराव चव्हाण सेंटर पुणे केंद्र, विशाल सह्याद्री ट्रस्ट भवन, विजयनगर कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे येथे सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या कार्याला मानवंदना दिली.

यावेळी बोलताना मिलिंद जोशी यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील योगदान, त्यांची दूरदृष्टी, शेतकरी, कष्टकरी, साहित्य आणि संस्कृतीबद्दलची तळमळ यांचा आढावा घेतला. चव्हाण यांनी दिलेले विचार आणि संस्कार पुढच्या पिढीने जपले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर, पुणे केंद्राचे अध्यक्ष अजित निंबाळकर,सचिव अंकुश काकडे आणि कोषाध्यक्ष डॉ.विशाल तांबे यांनी केले होते. यावेळी श्रीकांत पाटील, मनाली भिलारे, सौ.मृणालिनी वाणी,रवी चौधरी,अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे,केंद्राचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.सचिव अंकुश काकडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.डॉ. विशाल तांबे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. 

प्रा.मिलिंद जोशी म्हणाले,' विचारकेंद्री राजकारणाचा पाया त्यांनी महाराष्ट्रात रचला.राज्यशास्त्रात सांगितल्याप्रमाणे नेतृत्व या मातीतले असले पाहिजे,त्यांची बौद्धिक ऊंची  समाजापेक्षा थोडे अधिक असायला हवे असते,त्यांचे एक पाऊल समाजाबरोबर असले पाहिजे आणि एक पाऊल  समाजाच्या पुढे असले पाहिजे.या सर्व निकषामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व बसत होते.महाराष्ट्राची एक प्रमाणभाषा असावी आणि एक लेखनपद्धती असावी,असा आग्रह धरला.त्यातून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ,साहित्य संस्कृती मंडळ,विश्वकोश निर्मिती मंडळ,भाषा सल्लागार समितीची  स्थापना झाली.साहित्यिकांशी चव्हाण यांचे चांगले स्नेहसंबंध होते.  डॉ.विशाल तांबे म्हणाले,'पत्रलेखन हेही  यशवंतराव चव्हाण  यांचे  वैशिष्ट्य होते.जगात कोठेही गेले तरी त्यांच्या पत्नी वेणूताई यांना ते रोज एक पत्र लिहीत.राजकारण,समाजकारण,साहित्य सर्व प्रांतात त्यांनी ठसा उमटवला.त्यातून कार्यकर्त्यांना बरेच शिकायला मिळते.     

 


 Give Feedback



 जाहिराती