पुणे :शिवाजीनगर न्यायालय आवारात झालेल्या खूनी हल्ल्याच्या घटनेवरुन राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहराध्यक्ष डॉ.विशाल तांबे यांनी कायदा सुव्यवस्था स्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले ,'ज्या ठिकाणी सर्वाधिक पोलीस बंदोबस्त असतो, त्या शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात गोळीबार होणे ही पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. न्यायालयासमोर गोळीबार आणि हत्याराने मारून निर्घृणपणे दिवसाढवळ्या झालेला खुनी हल्ला हा राज्याची कायदा आणि सुव्यवस्था निष्फळ आणि कुचकामी असल्याचे स्पष्ट करत आहे'.
'कोयता गँग आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणेकरांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. पोलीस आयुक्त ठोस भूमिका घेत नाहीत आणि गृहखाते असलेले मुख्यमंत्री पुण्यात येऊनही यावर कोणतीही बैठक घेत नाहीत, हे दुर्दैवी आहे ! पुणे पोलीस आयुक्त आणि गुह्खात्याची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ढासळत्या कायदा -सुव्यवस्था स्थितीला जबाबदार आहेत',असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.