पुणे : 'संविधान ग्रुप'च्या वतीने भारतीय संविधान दिन आणि 'संविधान ग्रुप'चा बारावा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला 'संविधान ग्रुप'चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल व संस्थापक अध्यक्ष राकेश सोनवणे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण केला.मानवी मुल्यांसाठी कार्यरत राहण्याची शपथ घेण्यात आली.यावेळी उपस्थित संविधान प्रचारक कार्यकर्त्यांना अन्नदान करण्यात आले तसेच आंबेडकरी विचारांची पुस्तके भेट देण्यात आली.राहुल आवळे,प्रशांत कसबे,भरत एडके,सागर सोनवणे,मुदस्सर शेख,विवेक माडेकर,गणेश राठे,योगेश माने,अशोक थोरात,शुभम घारे उपस्थित होते.