पुणे: एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या संविधान कट्ट्यावर प्रा. मधु दंडवते ग्रंथालय व अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते . सुकन्या देऊलकर यांनी प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.सहसचिव उपेंद्र टण्णू यांनी भूमिका मांडली.आरती गुजर व शिवम टकले यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. संविधान संवादक साथी हृदयमानव यांनी संविधानाशी आपली बांधिलकी या विषयावर संवाद साधला. सूत्रसंचालन अभ्यासिकेचे शेखर सोनार यांनी व आभार संतोष केंगले यांनी मानले.कार्यक्रमास फाउंडेशनचे व्यवस्थापक राहुल भोसले, किरण पाटील आणि प्रा.मधू दंडवते वाचनालय व अभ्यासिकेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे नियोजन शेखर सोनार व संतोष केंगले यांनी केले होते.