सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बदलापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत! जीव वाचवण्यासाठी पळालेल्या १८ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
  • संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू
  • मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
  • पुण्यात १५ ऑगस्ट चौकात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
 जिल्हा

राज्यात ३५० अद्ययावत रुग्णवाहिकांचे लवकरच वितरण प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात रुग्णवाहिका -सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

डिजिटल पुणे    27-11-2026 14:29:47

मुंबई : राज्यातील आरोग्य सेवांना अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून आपत्कालीन रुग्णसेवेला नवे बळ देण्यासाठी राज्यातील आरोग्य विभागाच्या ताफ्यात लवकरच ३५० अद्ययावत रुग्णवाहिकांची भर पडणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात या रुग्णवाहिकांचे वितरण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

मंत्रालयात आज रुग्णवाहिका लोकार्पणाच्या सद्यस्थितीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री आबिटकर बोलत होते. या बैठकीला आरोग्य आयुक्त डॉ. संजय काटकर, तसेच संबंधित एजंसीचे प्रतिनिधी उपस्थित होते.राज्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आणि आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी शासन सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहे. या वाहनांचे ब्रँडिंग आठ ते दहा दिवसांत पूर्ण करावे. तसेच वाहन नोंदणीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. लोकार्पणानंतर स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत संबंधित मतदारसंघांमध्ये या वाहनांचे वितरण करण्यात येणार आहे. वाहनामध्ये १२०० प्रशिक्षित डॉक्टर, वाहनचालक, सहायक आणि आधुनिक लाईफ सपोर्ट सिस्टिमसह या रुग्णवाहिका दाखल होतील, असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

वाहनांसोबत चालक व्यवस्थापनावरही भर

रुग्णवाहिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना नवीन वाहनांची उपलब्धता, चालकांची उपलब्धता आणि त्यांचे व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले. १०२ रुग्णवाहिकांचे पेट्रोल कार्ड वितरणाचा प्रश्न, वाहनचालक इत्यादी प्रश्न निकाली काढून त्या रुग्णवाहिकांना गती द्यावी. तसेच कामकाजात त्रुटी आढळलेल्या चालकांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. नवीन रुग्णवाहिकांचे वितरण, आपत्कालीन सेवांचा समन्वय आणि चालक व्यवस्थापन या माध्यमातून राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांसाठी एकात्मिक कॉल सेंटर

दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सुसूत्र आणि प्रभावी करण्यासाठी १०२, १०८ आणि ११२ या आपत्कालीन सेवांसह खासगी रुग्णवाहिकांचा समन्वय साधणारे एकात्मिक कॉल सेंटर उभारण्याचा प्रस्ताव परिवहन आयुक्तांकडे सादर करावा. या व्यवस्थेमुळे विविध सेवांमधील रुग्णवाहिकांची उपलब्धता एकाच ठिकाणी समन्वित करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती