सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • त्रिबंकेश्वर मंदीर अ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून जाहीर
 DIGITAL PUNE NEWS

भर रस्त्यात BMW थांबवून लघूशंका; पुण्यात महिला दिनी मद्यधुंद तरुणांकडून अश्लील वर्तन

डिजिटल पुणे    08-03-2025 14:48:12

पुणे:  पुण्यात काही दिवसांपुर्वी कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेमध्ये कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडवल्याची घटना घडली होती. या घटनेची चर्चा संपूर्ण राज्यासह देशभरात झाली. त्यानंतर आता मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध चारचारी गाडी उभी करून दारूच्या नशेत तरूणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरूणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध BMW गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली आहे. 

नेमकं काय घडलं?

शनिवारी सकाळी एका मद्यधुंद तरुणाला शास्त्रीनगर चौकात रस्त्यावर लघुशंका करताना नागरिकांनी अडवलं. मात्र, त्याने गाडीमध्ये बसून अडवणाऱ्या व्यक्तीला उद्देशून अश्लील हावभाव केले. त्यानंतर, गाडी भरधाव वेगात चालवत बेदरकारपणे पुढे गेला. दारू पिऊन गाडी चालवत असताना या तरुणाने आणि त्याच्या मित्राने महिलांसमोरही अश्लील वर्तन केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकातील ही संतापजनक घटना आहे. सिग्नलवरती BMW गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली. जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीनं समोर देखील या तरूणांनी अश्लील कृत्य केलं. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्हेगारी आणि गुन्ह्यांच्या घटना यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशातच असं वर्तन करणाऱ्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं चित्र दिसून येत आहे.

या घटनेनंतर शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या वर्तनाला वचक बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती