सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे. ॐ मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागतम जन्म मृत्यु जरा व्याधि पीड़ितं कर्म बंधनः

डिजिटल पुणे    24-03-2025 10:36:32

महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे.ॐ मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागतम जन्म मृत्यु जरा व्याधि पीड़ितं कर्म बंधनः

महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे. या मंत्राचे अनेक नाव आणि प्रकार आहेत. याला रुद्र मंत्र असेही म्हणतात .त्र्यंबकम मंत्र हा भगवान शिवाचे त्रिनेत्र दर्शवितो.याला कधी कधी मृत संजीवनी मंत्र ही म्हणतात कारणयात गेलेले प्राण परत आणण्याची क्षमता आहे. 

आपल्या वीरशैव धर्मांत भगवान शिव यांची खूप भक्ती केली जाते. आपले सर्व दु:ख, दरिद्रे तसचं आरोग्याचे निवारण करण्यासाठी भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो,  भगवान शिव यांची अनेक नावे प्रसिद्ध आहेत. आपल्या भक्तांच्या हाकेला पटकन धावून येणारे देव म्हणून त्यांना भोलेनाथ देखील म्हटल जाते.महामृत्युंजय म्हणजे मरनावर विजय मिळविणे .महामृत्युंजय मंत्र जाप हा निरोगी आणि दीर्घायुष्य मिळविण्यासाठी करतात. महामृत्युंजय म्हणजे त्र्यंबकेश्वर.श्री त्र्यंबकेश्वराला दुखाचा आणि दानवाचा विनाशक म्हणतात

आपल्या वीरशैव सांस्कृतिक मान्यतेनुसार,  ३३ करोड देवतांमध्ये भगवान शिवा यांना ‘शिरोमणी’ मानलं जाते. म्हणूनच आपण त्यांना देवाधिदेव महादेव असे म्हणतो. सृष्टीतील तिन्ही  लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ असे अलौकिक शक्ती असणारे भगवान शिव हे महान देव आहेत.अश्या भगवंताचे वर्णन करावे तितके कमीच. भगवान शिव यांना मृत्यूवर विजय पावणारे देव म्हणून ओळखले जाते. कारण, समुद्र मंथनातून प्रकट झालेल विष त्यांनी स्व:ता प्राशन केलं होत. म्हणून त्यांना नीलकंठ देखील म्हटल जाते.यजुर्वेद ग्रंथात लिखित महामृत्युंजय मंत्रात त्यांच्या सर्व शक्ती सिध्दी चे वर्णन केलं आहे. शिवभक्त आपले सर्व दु:ख दरिद्रे नाहीसे करण्यासाठी नियमित या महामृत्युंजय मंत्राचा जप करीत असतात.

महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मन प्रसन्न होवून जाते. भगवान शिवाची आराधना करण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्यात तसचं, महाशिवरात्री, आदी प्रसंगी या मंत्राचे पठन मंदिरात सतत सुरु असते.

आपल्या सर्व दुःखाचे निवारण करणारे आपल्या जीवनांत सुख शांती आणि चांगले आरोग्य लाभ देणाऱ्या या महामृत्युंजय मंत्राचे  आपण नियमित पठन करावे. आम्ही देखील खास आपल्यासाठी या लेखाच्या माध्यमातून महामृत्युंजय मंत्राचे लिखाण केलं आहे.

महा मृत्युंजय मंत्राचा अक्षरशः अर्थ असा:

त्रयंबकम् = त्रि-नेत्र असणारा (कर्मकारक)

यजामहे = आम्ही पूजन, सम्मान करतो, आमचे श्रद्देय

सुगंधिम् = सुगंधित (कर्मकारक)

पुष्टिः = एक सुपोषित स्थिति, फाळणारी-फुलणारी, समृद्ध जीवनाची परिपूर्णता

वर्धनम् = जो पोषण करतो, जो शक्ति देतो, स्वास्थ्य, धन, सुख यांचा वृद्धिकारक; जो हर्षित करतो, आनन्दित करतो

उर्वारुकम = काकडी (कर्मकारक)

इव = जसे, अशा रीतीने

बन्धनात् = लौकीचे तण, उन्मोचन

मृत्योः = मृत्यु पासून

मुक्षीय = स्वतंत्रता दे, मुक्ति दें

मा = न

अमृतात् = अमरता, मोक्ष

श्लोकार्थ: आम्ही त्रि-नेत्रीय वास्तविकतेचे चिंतन करतो जो जीवनाच्या मधुर परिपूर्णतेला पोषित करतो आणि वृद्धि देतो. काकडी सारखे आम्ही त्याच्या तणापासून अलग (“मुक्त”) हों, अमरत्वाने नाही तर मृत्यु ने मुक्त होवोत.

समस्त संसाराचे पालनहार, त्रिनेत्री शिवाची आम्ही अराधना करतो. या अखिल ब्रह्माण्डात सुरभि पसरविणाऱ्या भगवान शिवांनी आम्हाला मृत्‍यु न कि मोक्ष पासून आम्हाला मुक्ति द्यावी.पण हा जप करण्याचा एक विशिष्ट विधी आहे, स्पष्ट अधिकार आहेत. तो फक्त गुरुमुखातून संथेद्वारे घ्यावा लागतो. तो षट्कर्णी होऊ न देता अभिमंत्रित करवून शक्तीसहीत दिला जातो. शिवाय म्हणताना देखील काय दक्षता घ्यायच्या, तो कसा म्हणायचं, उच्चार कसे करायचे, स्वर, आरोह, अवरोह, चाल, ताल आदी गोष्टी सांगितल्या जातात, आपले ध्यान कसे केंद्रित करायचे ते देखील सांगितले जाते.

या आणि इतर अनेक बाबी आहेत ज्या अशा कुणीही दिला आणि जप करायला सांगितले आणि तो जप केला तर त्याचे फळ मिळेल असा भाग मुळीच नाही. आजकाल आपल्या वैदिक संस्कृतीचा जाणून बुजून असा ऱ्हास चालवला आहे, कुणीही उठतो आणि काहीही करायला सांगतो. चेन मेसेजेस सोशिअल प्लॅटफॉर्म वर येतात आणि तो मंत्र म्हणून आपल्याला तो पुढे फॉरवर्ड करण्याचे सांगितले जाते असे चेन मेसेजेस तिथल्या तिथेच तोडले पाहिजे. कारण असे अवेळी, अकाली, अशुद्ध, अपवित्रतेने, आचार-विचार-आहार-विहार न पाळता मंत्रजप केल्याने त्याचे परिणाम अतिशय गंभीर आणि घातक होतात. हे सर्व एक तर संस्कृती विरोधक समाज मुद्दाम करत आहे आणि सांगत सुटले आहेत की बघा आम्ही कसे या सगळ्यांना वेडे बनवत आहोत, नाही तर ज्यांना शास्त्राचे अपुरे ज्ञान आहे ती लोक देखील असा बावळटपणा करत आहेत.तेव्हा कृपा करून या सर्वांपासून दूर राहा.

महामृत्युंजय मंत्राचे सहा अंग आणि अभिप्राय: महामृत्युंजय मंत्राच्या (१) वर्णाचे, (२) पदाचे, (३) वाक्याचे, (४) चरणांचे, (५) अर्ध्या ऋचांचे आणि (६) संपूर्ण ऋचांचे असे सहा अंग आणि त्याचे वेगवेगळे अभिप्राय आहेत.

ओम त्र्यंबकम् मंत्राचे ३३ अक्षर आहेत, जे महर्षि वशिष्ठ यांच्या अनुसार ३३ देवतांचे द्योतक आहेत. त्या तेहेतीस देवतांमध्ये अष्टवसू (८), ११ रुद्र, १२ आदित्य, १ प्रजापति आणि १ षटकार आहेत. या तेहेतीस देवतांच्या साऱ्या शक्ति महामृत्युंजय मंत्रामध्ये निहीत होतात. ज्याने महा महामृत्युंजय मंत्राचा पाठ करणारा दीर्घायु तर प्राप्त करतोच पण त्याच बरोबर तो निरोगी, ऐश्व‍र्ययुक्त, धनवान देखील होतो. महामृत्युंजय पाठ करणारा प्रत्येक दृष्टिने सुखी आणि समृध्दिशाली होतो. भगवान शिवाची अमृतमययी कृपा त्याच्यावर निरन्तंर बरसत असते. 

कलियुगात केवळ भगवान शिवाची पूजा फल देणारी आहे. समस्तं पापं एवं दु:ख भय शोक आदि चे हरण करण्यासाठी महामृत्युंजय विधिच श्रेष्ठ आहे. आणि म्हणून वर सांगितलेल्या  प्रयोजनात महामृत्युजंय पाठ करणे महान लाभकारी आणि कल्याणकारी आहे.

संग्रहक – वे.श्री ईश्वर स्वामी होळीमठ ( ज्योतिष शास्त्री ) सोलापुर.


 Give Feedback



 जाहिराती