पुणे : अनैतिक संबंधातून बायकोनेच प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील लोणी काळभोर परिसरात हि घटना घडली आहे. रविंद्र काळभोर वय ४५ असे मयत पतीचे नाव आहे.तर आरोपी पत्नी शोभा रविंद्र काळभोर वय ४२ आणि आरोपी प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर वय ४१ या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. काही महिन्यापूर्वीच्या पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणासारखंच हे प्रकरण असल्याच दिसत आहे.
याबाबत अधिक माहितीची अशी कि, पुणे शहरातील लोणी काळभोर परिसरातील वडाळे वस्ती परिसरात राहणारे रवींद्र काळभोर हे सोमवारी रात्री 11च्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर पलंगावर झोपले होते. मात्र पहाटेच्या सुमारास त्यांच्या डोक्यात दगडाने आणि लाकडी दांडक्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. सकाळी रवींद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.रवींद्र यांचे भाऊ भाऊसाहेब काशिनाथ काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या ३ तासांत पोलिसांनी या हत्येचा छडा लावला.
आरोपी पत्नी शोभा काळभोर आणि आरोपी प्रियकर गोरख काळभोर या दोघांमध्ये मागील पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते.या अनैतिक प्रेमसंबंध बाबत रविंद्र काळभोर यांना समजले.त्यावर रविंद्र काळभोर यांनी पत्नी शोभा यांना अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला.तरी देखील पत्नी काही केल्या ऐकत नव्हती,ती प्रियकराला भेटण्यास जात होती.त्यावरून दोघांमध्ये अनेक वेळा भांडण झाली. सततच्या भांडणाला आरोपी पत्नी शोभा वैतागली होती.त्यामुळे तिने नवऱ्याचा काटा काढायचं ठरवलं. त्यातच काल रात्री रविंद्र काळभोर हे घराबाहेर झोपले आहे.ही गोष्ट शोभा यांनी प्रियकर गोरख याला सांगितली. त्यानंतर प्रियकराने डोक्यात दगडाने आणि लाकडी दांडक्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.