सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूनंतर महापालिकेला आली जाग; खासगी रुग्णालयांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

डिजिटल पुणे    08-04-2025 15:04:48

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. यानंतर मंगेशकर रुग्णालयावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र डिपॉझिट न भरल्याने त्या गर्भवती महिलेला उपचार मिळाले नाहीत आणि त्या महिलेचा उपचारांअभावी मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणानंतर पुणे महानगरपालिका सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेने सर्व खासगी रुग्णालयांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गभर्वती महिलेचा डिपॉझिट न भरल्याने उपचारांअभावी मृत्य झाला. त्यानंतर आता पुणे महानगरपालिका सतर्क झाली आहे. पुणे महानगरपालिकेने सर्व खासगी रुग्णालयांना डिपॉझिट घेऊ नये अशी नोटीस बजावली आहे. आधी रुग्णावर उपचार करावेत आणि मग त्यांच्याकडे पैसे मागावेत असे आदेश या नोटिसीमधून देण्यात आले आहेत.


 Give Feedback



 जाहिराती