सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नाना पेठ येथील वाड्याला लागली भीषण आग,आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .
 विश्लेषण

जन्म त्रिशताब्दीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण होणार

डिजिटल पुणे    09-04-2025 16:00:22

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्टेशनजवळ असलेल्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याचे दुरुस्तीकार्य तसेच पाठीमागील भिंतीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य, महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोद्धार, वृक्षसंवर्धन या बाबींचा देखावा आकर्षक स्वरुपातील प्रकाश योजनेसह मांडण्यात येणार आहे.

आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिका सहायक आयुक्त श्री.जयदीप मोरे आणि अन्य अधिकारी तसेच डॉ.असिम गोकर्ण हरवंश यांची या कामासंदर्भात बैठक झाली.

हे काम दिनांक १५ मे, २०२५ च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. दिनांक ३१ मे, २०२५ रोजी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. या जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हा सुशोभित आणि पुष्पमंडित पुतळा तयार करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती