सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नाना पेठ येथील वाड्याला लागली भीषण आग,आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .
 विश्लेषण

पुण्याहून वाशिमला निघाले, समृद्धीवर काळाने घाला घातला, दोघांचा जागीच मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक

डिजिटल पुणे    11-04-2025 11:11:14

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. यात समृद्धी महामार्गावरील मेहकर नजीक नागपूर कॉरिडॉर वरच्या चेनेज 268 जवळ भीषण अपघात झाला आहे.भरधाव कार समोर जात असताना ट्रकला पाठीमागून धडकुन झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहे.समृद्धी महामार्गावर अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात आता पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. मेहकरजवळ भरधाव कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी (दि.11) पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आहेत.

पुण्याकडून कार वाशिमकडे चालली होती. त्यावेळी पहाटे हा अपघात झाला. समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ नागपूर कॉरिडॉरवर चेनेज 268 येथे पहाटे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. पुण्याहून वाशिमकडे जाणारी एक भरधाव कार समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या धडकेनंतर कारचा पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामधील जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या कारचालकाला पहाटे डुलकी लागल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मेहकरजवळ भरधाव कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल

मिळालेल्या  माहितीनुसार, पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.कार पुण्याहून वाशिमकडे जात असताना कार चालकाला झोपेची डुलकी आल्याने अनियंत्रित कार समोर जात असलेल्या ट्रकला धडकून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येतंय.जखमींवर मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र तिन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले आहे.

अपघातात दोघांचा मृत्यू

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी कार आणि ट्रक ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग जास्त असल्याने अशा अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यापूर्वीही या मार्गावर अनेक घटना घडल्या आहेत.


 Give Feedback



 जाहिराती