सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 जिल्हा

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते बाभळगाव येथील विविध विकास कामाचे लोकार्पण

गजानन मेनकुदळे    14-04-2025 15:25:39

लातूर : राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते बाभळगाव येथील वैशालीनगर मौलाना वस्तीतील आमदार निधीतुन तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ता, बाभळगांव मधील गणेश मंदिर जवळील दत्ता जाधव ते साहेबराव मस्के यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्ता, बाभळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सोलार प्रकल्पाचे लोकार्पण, ऑनलाईन करप्रणाली व नागरी सुविधा संकेत स्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी बाभळगाव  ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तेथे नव्याने उभारण्यात आलेल्या  सोलार प्रकल्पाचे लोकार्पण तसेच ऑनलाईन करप्रणाली व नागरी सुविधा संकेत स्थळाचा शुभारंभ केला.  यानंतर गावातील गणेश मंदिर जवळील दत्ता जाधव यांचे घर ते साहेबराव मस्के यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पणही करण्यात आले. तसेच वैशाली नगर मधील मौलाना वस्तीमध्ये आमदार स्थानिक विकास निधीमधून बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, बाभळगावच्या सरपंच श्रीमती प्रिया मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, ग्रामसेवक शंकर भोसले गावातील ज्येष्ठ नागरिक विविध संस्थांचे प्रतिनिधी, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, २१ शुगर कारखान्याचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे, बाभळगाव ग्रामपंचायत सरपंच प्रिया सचिन मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, ग्रामविकास अधिकारी भोसले, सचिन मस्के, राम स्वामी, अनिल मरके, जहांगीर सय्यद, मौलाना हाफीज शकूरसाब, मौलाना इनाम साब, मौलाना मुफ्तीअली, मौलाना रियाजसाब, मुजाहिद साब,शबीर शेख, उमाकांत मस्के, जहांगीर पठाण, भरत सावळे, वसंत मस्के, सुजित सलगरे, आदिसह बाभळगाव ग्रामपंचायतचे सदस्य, नागरिक काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 


 Give Feedback



 जाहिराती