पिंपरी चिंचवड : रविवार दिनांक -१३ एप्रिल २०२५ रोजी खंडोबा मंदिर सांस्कृतिक भवन येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला संस्थेच्या या मेळाव्याला देखील गेल्या ८ वर्षांप्रमाणे याही वर्षी भरभरून प्रतिसाद मिळत २२०/- उपवधु आणि उपवरांनी नोंदणी केली.




या कार्यक्रमाला माननीय, प्रवीण स्वामी API, शिवानंद स्वामी PSI, राजशेखर कंदलगावकर(सोलापूर ),विश्वनाथ स्वामी (नांदेड),महेश कुगावकर(पुणे ),मन्मथ स्वामी(लातूर),रेणुका ताई भस्मारे(पुणे),बसवराज पंतुलवार(पनवेल), अरुण स्वामी पेडगावकर (परभणी) शिववार्ताचे संपादक मारोती स्वामी (नांदेड),संस्थेचे मार्गदर्शक मा.संजय मानूरकर,राजेश चिट्टे,विश्वनाथ स्वामी,गुरुराज चरंतीमठ ,प्रशांत भाणसे,संस्थेचे अध्यक्ष,विजय जंगम महिला आघाडी अध्यक्ष संध्या ताई स्वामी वधू वर विभाग प्रमुख,जयश्रीताई जंगम या सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात एकजुटीने कार्य करणाऱ्या संस्थेच्या सच्चा कार्यकर्त्यांचे,महिला आघाडी, युवा आघाडी यांचे संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार व अभिनंदन तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणारे मान्यवर ,वधुवर, पालक व समाज बांधव यांचे देखील संस्थेचे अध्यक्ष,विजय जंगम यांनी संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार मानले आहेत....


आपणा सर्वांचे सहकार्य संस्थेला सदैव असेच लाभत राहील हिच सदिच्छा....धन्यवाद