पुणे : Vishwakarma Institute of Technology (VIT), पुणे येथील E-Cell तर्फे आयोजित करण्यात आलेल्या E-Summit Pune’25 साठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, यंदाची थीम “The Shadows of Resurrection” ही आहे. या वर्षीचे संमेलन हे अतिशय खडतर प्रवासातून वर आलेल्या नवउद्योजकांना समर्पित असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन आमदार व बारामती अॅग्रोचे प्रमुख रोहित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
१५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या संमेलनामध्ये विद्यार्थ्यांपासून ते प्रोफेशनल्सपर्यंत सर्वांसाठी त्यांच्यातील उद्योजकीय भावनांना चेतना देणाऱ्या विविध स्पर्धा, कार्यक्रम आणि प्रेरणादायी व्याख्याने यांचा समावेश असणार आहे.
E-Summit Pune’25 मधील मुख्य आकर्षण:
• Startup Showcase: नवोदित उद्योजकांसाठी आपले स्टार्टअप सादर करण्याची आणि त्याचे मार्केटिंग करण्याची सुवर्णसंधी.
• हाय-स्टेक स्पर्धा :
• Pitch Perfect: स्टार्टअप आयडियाचे प्रभावी सादरीकरण, परीक्षकांच्या गुगली प्रश्नांना उत्तरे, तसेच अचानक उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे कौशल्य दाखवण्याची संधी.
• Board Room: सहभागी कार्यकारी अधिकारी बनून व्यावहारिक समस्यांवर निर्णय घेण्याची कसोटी पाहणारी रोमांचकारी स्पर्धा.
• E-Talks: खडतर प्रवासातून अनेक संकटांना तोंड देत यश मिळवणाऱ्या उद्योगजगतातील दिग्गजांशी संवाद.
• Summit Showdown: संमेलनाचा समारोप
“The Shadows of Resurrection” ही संकल्पना सांगते की, अपयश म्हणजे शेवट नाही, तर नवीन सुरुवातीसाठीची संधी आहे. आयोजकांच्या मते, “यश म्हणजे अपयश टाळणे नव्हे, तर प्रत्येक वेळी अधिक बळकटपणे उभं राहणं हेच खरं यश आहे.”
१८ एप्रिल रोजी होणाऱ्या प्रमुख E-Talks सत्रांमध्ये सहभागी वक्ते:
• पॉला मॅकग्लिन – गुलबदन टॉकीजच्या सीईओ आणि सह-संस्थापिका, तसेच भाडिपा, भा२पा आणि शांतित क्रांती सारख्या नाविन्यपूर्ण डिजिटल चॅनल्सचे निर्माती. त्यांच्या कार्याने मराठी डिजिटल विश्वात सांस्कृतिक क्रांती घडवली आहे.
• असीम श्रीवास्तव – किर्लोस्कर लिमिटलेसचे HR प्रमुख आणि किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडचे माजी सीईओ. L&T आणि McNally Group सारख्या कंपन्यांमध्ये ३२ वर्षांचा अनुभव असलेले नेतृत्व.
• संदीप जैन - GeeksForGeeks चे फॉऊंडर आणि सी. ई . ओ . एक दूरदर्शी शिक्षक आणि उद्योजक ज्यांनी लाखो विध्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान शिक्षणात क्रांती घडवून आणली आहे.
• गौरी शंकर साहू – बार्कलेज (Barclays) इंडियाचे डायरेक्टर. जागतिक वित्तीय क्षेत्रातील दोन दशकांचा अनुभव असलेले प्रभावशाली नेतृत्व, जे संकटांमधून मार्ग काढण्याचे कौशल्य शिकवतील.
E-Summit Pune’25 द्वारे VIT College उद्योजकतेच्या वाटचालीत एक भक्कम पायरी उभी करत आहे, जिथे अपयश घाबरवणारे नसून, पुढच्या यशाचा पाया ठरते.
१५ एप्रिल २०२५ रोजी, VIT कॅम्पसवरील शरद अरेना ऑडिटोरियम येथे कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, नोंदणीकृत सहभागींसाठी प्रवेश खुला असणार आहे.