सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

सामाजिक न्याय विभागाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

डिजिटल पुणे    15-04-2025 10:47:52

पुणे : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती एप्रिल महिण्यात साजरी करण्यात येते. महामानवांच्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून युवक युवतींमध्ये त्यांचे विचार आणि शिकवण रुजविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याअनुषंगाने सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे व निवारा वृध्दाश्रम, नवी पेठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने १३ एप्रिल रोजी निवारा वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरीकांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणेत आले होते.

या शिबिरामध्ये न्युरो चेक अप, भाषेचे मुल्यांकन, स्मृती मुल्यांकन, श्रवण मुल्यांकन, वृध्दांमधील पडण्याच्या धोक्याचे मुल्यांकन करणेत आले. या शिबीरामध्ये १२० ज्येष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच या निमित्त पुणे जिल्हयातील शासकीय वसतिगृहांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करणेत आले होते. त्यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या शिबीरात रक्तदान केले.सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतिगृहातील गृहप्रमुख,गृहपाल व कर्मचारी यांनी अनुसूचित व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये जावून परीसराची स्वच्छता केली.


 Give Feedback



 जाहिराती