लातूर : १५ एप्रिल २५ :सहकार आणि साखर उदयोगाच्या यशस्वी वाटचालीसाठी पथदर्शी ठरलेल्या विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी वैशालीताई विलासराव देशमुख यांची तर व्हा. चेअरमनपदी वैजनाथराव शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.विलास सहकारी साखर कारखान्याची २१ जागेसाठी सन २०२५ ते ३० साठी पंचवार्षीक निवडणुक झाली. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मुख्य प्रतोद विधीमंडळ काँग्रेस, महाराष्ट्र विधानसभा, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलासराव देशमुख सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणुक लढवली. विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणीपासूनची वाटचाल पाहता सर्व सभासदांनी ही निवडणुक बिनविरोध निवडूण दिली आहे.
विलास कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर चेअरमन आणि व्हा.चेअरमन पदाची निवड प्रक्रिया मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी तथा अध्याशी अधिकारी रोहिणी नऱ्हे - विरोळे यांच्या अध्यक्षमेखाली निवड प्रक्रीया पार पडली. चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाच्या निवडीसाठी झालेल्या बैठकीस माजी आमदार वैजनाथराव शिंदे, रविंद्र काळे, रणजित राजेसाहेब पाटील, अनंत व्यंकटराव बारबोले, रसूल दिलदार पटेल, तात्यासाहेब छत्तू पालकर, गोवर्धन मोहनराव मोरे, हणमंत नागनाथराव पवार, नरसिंग दगडू बुलबुले, नेताजी शिवाजीराव साळुंके (देशमुख), नितीन भाऊसाहेब पाटील, रामराव विश्वनाथ साळुंके, अमृत हरिश्चंद्र जाधव, सतीश विठ्ठलराव शिंदे (पाटील), दीपक अर्जुन बनसोडे, लताबाई रमेश देशमुख, शाम भारत बरुरे, सुभाष खंडेराव माने संचालक यांच्यासह सहायक निबंधक रेणापूर आर. एल. गडेकर, नायब तहसीलदार श्रीमती अर्चना मैंदर्गी, नायब तहसीलदार सुधीर देशमुख, महसुल सहायक ओमप्रकाश मेहकर यांची उपस्थिती होती. सर्व संचालक मंडळाची बैठक होऊन बिनवीरोध निवड प्रक्रीया पार पडली. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी वैशालीताई विलासराव देशमुख यांची तर व्हा. चेअरमनपदी वैजनाथराव शिंदे यांची बिनविरोध निवड यावेळी झाली.
विलास कारखान्याचे लोकनेते विलासरावांच्या नावाला साजेसे कार्य;अमित देशमुखांनी व्यक्त केला विश्वास
विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सत्कार समारंभात बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कारखान्याच्या वाटचालीवर समाधान व्यक्त केले. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नावाने कार्यरत असलेला हा कारखाना त्यांच्या नावाला साजेसे कार्य करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर पुढे बोलतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, "मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्यांच्या निवडणुका सभासदांनी बिनविरोध पार पाडल्या आहेत. आपणही आपल्या प्रथेप्रमाणे चेअरमन, व्हा. चेअरमनची निवडणूक प्रक्रिया ही बिनविरोध पार पाडली आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नावाने हा विलास सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे, त्यांच्या नावाला साजेसे कार्य आपण करत आहोत. या संस्थेला २५-३० वर्षे आता पूर्ण होत आहेत. या ठिकाणी उपस्थित्यांपैकी अनेक जण या कारखान्याचे संस्थापक संचालक आहेत, संस्थेच्या जडणघडणीत प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे. संस्थेच्या प्रवासात आपण सर्वांना सामावून घेण्याचे काम केले आहे. संस्था टिकली पाहिजे, संस्थेचे चांगले काम झाले पाहिजे, यासाठी आपण काम करत राहतो. आज पुढील पंचवार्षिक कारखान्याच्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. सध्याच्या संचालक मंडळात काही नवीन संचालक आहेत, तर काही जुने संचालक यांना पुन्हा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे."
पुढे बोलताना ते म्हणाले, "लोकनेते विलासराव देशमुख यांनी मांजरा पट्ट्यात या निवळीच्या माळरानावर हे शेतकऱ्यांचे मंदिर उभारले. या माळरानाचे नंदनवन आता झाले आहे. या कारखान्याचे भविष्यात युनिट एक, दोन, तीन, चार होतील. येणारा हंगाम मोठा आहे. मांजरा, विलास, रेणा सहकारी साखर कारखाने आदरणीय विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शनाने चांगले चालत आहेत. येथे सभादाच्या हिताचा कारभार असल्याने निवडणुका बिनविरोध होतात याचे सर्व श्रेय सभासदांचे आहे. या संस्था अधिक सक्षम होऊन शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सध्याचा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचा आहे, त्याचा वापर शेतकऱ्यांनी ऊस शेतीमध्ये करावा." शेवटी त्यांनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या नूतन चेअरमनपदी वैशालीताई विलासराव देशमुख आणि व्हा. चेअरमनपदी माजी आमदार वैजनाथदादा शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलतांना नूतन चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त करून विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी सर्वांनी काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
यावेळी बोलतांना नूतन व्हा. चेअरमन वैजनाथदादा शिंदे म्हणाले की, या विलास कारखान्याला जमीन खरेदी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. देशात राज्यात एक नंबरचा हा कारखाना नावाजलेला आहे, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना उभा राहिला आहे. लोकनेते विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे, आपण कारखान्याचे मालक नाही आहोत आपण फक्त विश्वस्त आहोत. विलास सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी सर्व नेत्यांनी मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी व्हा. चेअरमन रवींद्र काळे यांनी करून नूतन चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख व व्हा. चेअरमन माजी आमदार वैजनाथराव शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच व्हा. चेअरमनपदी पाच वर्षे काम करण्याची संधी दिल्याबद्दल मान्यवरांचे त्यांनी आभार मानले.प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख व मान्यवरांनी विलास सहकारी साखर कारखाना परिसरातील लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, टवेन्टिवनचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, पी.के.पाटील, राजेंद्र मस्के, भैरवनाथ सुर्यवंशी, बळवंत काळे, राजाभाऊ जाधव, चंद्रशेखर दंडीमे, रामचंद्र सुडे, उमेश बेद्रे, चंद्रकांत टेकाळे, जयचंद भिसे, रमेश थोरमोटे पाटील, जगदीश चोरमले, प्रभावती माळी, सुभाष जाधव, अनिल पाटील, गोविंद बोराडे, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, सुर्यकांत सुडे, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडीले, रमेश देशमुख आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले तर शेवटी आभार माजी व्हाईस चेअरमन गोविंद बोराडे यांनी मानले.