उरण : फुले शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान जासई व भारतीय बौद्ध महासभा उरण तालुका यांच्या संयुक्तिक रित्या भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर , क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज सर्वच महापुरुषाची संयुक्त जयंती महोत्सव जासई , उरण याठिकाणी मोठया उत्साहात पार पडला . यावेळेस सकाळच्या सत्रात जासई हायस्कुल येथे महापुरुषाच्या पुतळ्यास हार घालुन अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्तिथ उरण मा . पंचायत समिती सभापती नरेश घरत , राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस कामगार नेते संतोष भाई घरत , गावातील प्रमुख सभासद बळीराम घरत , गोपीनाथ म्हात्रे , गणेश पाटील , ह भ प गोपीनाथ ठाकुर , तसेच ग्रामपंचायत सदस्य रामकिशोर ठाकूर , आदित्य घरत , श्रुष्टि म्हात्रे,अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महापुरुषांना हार घालुन जासई हायस्कुल ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दास्तान फाटा ते फुलेनगर डुंबावाडी इथपर्यंत समता बाईक रॅली काढण्यात आली. याचे नेतृत्व युवक प्रेम खंदारे व त्यांच्यासोबत असलेल्या सर्व युवकांनी केले , त्यानंतर फुलेनगर डुंबावाडी येथे प्रमुख पाहुण्यांचे मनोगत व महापुरुषांच्या प्रतिमेसमोर वंदन करण्यात आले यावेळी संतोष घरत यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग सांगितले व आंबेडकर भवन २०२६ पर्यंत पूर्ण करू असे सर्वाना संबोधित केले. तर उपस्तिथ रयत शिक्षण संस्थेचे मानकरी नुरा शेख सरांनी हि वास्तु याठिकाणी कशी होईल व त्यासाठी लढा लढताना आपण काय केले पाहिजे व विद्यार्थी कसे घडले पाहिजे हे सांगितले.
ग्रामपंचायत सदस्य आदित्य घरत यांनी महिलांची जबाबदारी म्हणजेच घरातील महिला शिक्षित झाली तर घर शिक्षित होते तसेच सर्व महापुरुषाच्या मागे कर्तृत्वान स्त्रीचाच हात आहे असे सांगितले . ऍड.संघपाल प्रधान, इंजिनियर विकी मस्के , जयंती उपाध्यक्ष मुकुंद घोंगडे , जयंती अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांनी हि आपले विचार मांडले. प्रमुख मान्यवर असलेले रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर पवार व जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनीही यावेळी आपले विचार मांडले.कार्यक्रमास आश्विनी माळी यांच्या डान्सक्लास तर्फे बाबासाहेबांच्या गीतावर लहान मुलांनी नृत्य सादर केले. तर कार्यक्रमाचे छान सूत्रसंचालन विजय मस्के व सुरज पवार यांनी केले.
कार्यक्रमात फुले शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष अमोल शेजवळ यांनी २०२६ ला डॉ . आंबेडकर भवन पूर्णत्वास नेऊनच कार्यक्रम करायचा असे समस्त जनसमुदायास आवाहन केले. व नंतर छान अश्या भोजनाचा सर्वानी आस्वाद घेतला तर कार्यक्रमास सर्व फुले शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान चे पदाधिकारी , महिला आघाडी, युवक मंडळ व सर्व नागरिक उपासक - उपासिका , बाळ बालिका मोठया प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम प्रामुख्याने ज्यांच्या देखरेख खाली संपन्न झाला असे उरणचे पोलीस कॉन्स्टेबल गरडे साहेब, आणी भाटे साहेब यांची हि उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. मोठया आनंदात विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आबेडकर यांची १३४ वि जयंती फुले शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान जासई यांच्या वतीने साजरी करण्यात आली .