सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 जिल्हा

दिपीशा कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिटयूट उलवे तर्फे अनूवंशिक कॅन्सर विषयक जनजागृती; विविध रुग्ण, नागरिकांनी घेतला मोठया प्रमाणात लाभ

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    28-04-2025 11:19:47

उरण : सध्या सर्वत्र मोठया प्रमाणात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. विविध कारणामुळे कॅन्सरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. अनेकांना कॅन्सरच्या रोगाने ग्रासले आहे. सध्याच्या युगात कॅन्सर रोग झपाट्याने सर्वत्र वाढत आहे. त्या अनुषंगाने कॅन्सर रोगा विषयी जनजागृती करत त्यावर उपाय योजना कशा कराव्यात. कॅन्सर कशामुळे होतो. कॅन्सर होऊ नये म्हणून नेमकी कोणती काळजी घ्यावी , कॅन्सर झाल्यावर कोणती काळजी घ्यावी, कॅन्सर अनुवंशिक आहे काय, अनुवंशिक बदलामुळे कॅन्सर कसा होतो, फॅमिली सिंडम कॅन्सर कसा होतो आदी विषयावर तज्ञ डॉक्टर वर्गाने उपस्थितांना मार्गदर्शन केले.

उलवे येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी दिल्ली येथील कॅन्सर तज्ञ  डॉ अनुपमा घोष,डॉक्टर पाटील, डॉक्टर शितल बिपाशा,दिपीशा कॅन्सर सेंटरच्या अध्यक्ष दिपाली गोडघाटे यांचे कॅन्सर विषयी मार्गदर्शन झाले.या कार्यक्रमासाठी साई संस्थांचे अध्यक्ष रवीशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पार्वती पाटील, शिरीष कडू, हरीश मोकल, पेशंट व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या शिबिराचा नागरिकांनीं मोठया प्रमाणात लाभ घेतला.


 Give Feedback



 जाहिराती