सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 शहर

विद्यार्थी शिकले 'पॉट आईस्क्रीम ' ची निर्मिती !प्रत्यक्ष कृतीतून घेतले शिक्षण

डिजिटल पुणे    28-04-2025 11:24:04

पुणे : जुन्या पेठेतील पुण्याचे उन्हाळी 'ट्रीट' असे वैशिष्ट्य असणाऱ्या पॉट आईस्क्रीम ची निर्मिती कशी होते हे कुतूहल शमविण्यासाठी जॅक एन जिल प्री-स्कुल आणि लिटिल होम डे केअर च्या बालचमूने कमला नेहरू उद्यानाजवळील शिरीष बोधनी यांच्या आईस्क्रीम सेंटरला भेट दिली.उन्हाळी शिबिराच्या निमित्ताने शनिवार,२६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडे चार वाजता  ही स्थळभेट आयोजित करण्यात आली. एकूण ४० विध्यार्थी,१० शिक्षिका  सहभागी झाल्या.जॅक एन जिल प्रीस्कुल आणि लिटिल होम डे केअर च्या संस्थापिका ज्योत्स्ना गटणे,मानसी कुलकर्णी, भारती कुलकर्णी उपस्थित होत्या.लाकडी पॉट मध्ये आईस क्रीम कसे तयार होते,पदार्थ कोणते वापरतात,आईस क्रीम चे किती प्रकार असतात,वेळ किती लागतो असे सर्व शिक्षण प्रत्यक्ष कृती करत देण्यात आले,अशी माहिती शिरीष बोधनी यांनी दिली.

'पॉट आईस्क्रीम'ची लज्जत

 

 

पुण्यातील उन्हाळ्याला अनेक दशकांपासून स्पॉट आईस्क्रीमने लज्जत मिळवून दिली आहे. वाड्यामध्ये सहकुटुंब पॉट फिरवून,बर्फ,मीठ टाकून, स्वतःच्या मेहनतीचे आईस्क्रीम तयार करणाऱ्या पुणेकरांना थेट घरोघरी आईस्क्रीम पुरवण्याची सेवा शिरीष बोधनी यांनी अनेक दशकांपूर्वी सुरू केली होती. त्यांच्या बरोबरचे पॉट आईस्क्रीम व्यावसायिक थांबले तरी बोधनी यांनी पॉट आईस्क्रीम पुणेकरांच्या साठी उपलब्ध ठेवले आहे.निव्वळ दूध आणि अस्सल फ्लेवर त्यामुळे पॉट आईस्क्रीम पुण्यात नावाजले जाते. यामध्ये कोणतीही भेसळ नसते आणि ते कृत्रिम पदार्थ टाकून अधिक लज्जतदार केले जात नाही.आईस्क्रीमचा मूळ स्वाद टिकून राहण्यासाठी आईसक्रीमची प्रक्रिया पुणेकरांच्या पसंतीस उतरली आहे.


 Give Feedback



 जाहिराती