सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

अयोध्या येथील भव्य सम्मान समारंभात,नाट्य कलावंत,दिग्दर्शक प्रा.अजय दासरी यांचा “पीएचडी”पदवी ने सन्मान संपन्न….!

डिजिटल पुणे    28-04-2025 12:55:53

अयोध्या नगरी : पंडित दीनदयाळ उपाध्याय हिन्दी विद्यापीठ वृन्दावन धाम मथुरा यांनी आज रविवार दि २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता,अयोध्या धाम येथील हॉटेल रेडिसन पार्क इन येथे आयोजित "राष्ट्रीय हिन्दी संगोष्ठी एवं सम्मान समारोह" मधे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख, नाट्य रंगकर्मी दिग्दर्शक,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर महानगर शाखा अध्यक्ष तथा मध्यवर्ती नाट्य परिषद मुंबई नियामक सदस्य प्रा अजय दासरी यांचा “विद्यावाचस्पती सारस्वत सम्मान ” (पीएचडी) देवून सन्मान करण्यात आले.

या कार्यक्रमास मुख्य अतिथि  म्हणून प‌द्मश्री माननीय डॉ. अरविन्द कुमार जी पूर्व कुलपति, रानी लक्ष्मीबाई केन्द्रीय कृषि विश्वविद्यालय, झाँसी हे होते.माननीय डॉ. इन्दु भूषण मिश्रा जी कुलपति, पं. दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ हे अध्यक्षस्थानी होते.मुख्य वक्ता म्हणून माननीय सुश्री दीपा मिश्रा जी सुप्रसिद्ध कथा – वाचिका वृन्दावन धाम, मथुरा यांची उपस्थिती होती.

इत्यादि विद्वतजनांच्या पावन सानिध्यात सम्पन्न झालेल्या या समारंभात प्रा अजय दासरी याना पीएचडी पदवी प्रमाणपत्र,स्मृती पदक,शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांनी आजपर्यंत केलेल्या रंगभूमी वरील नाट्यप्रवासातील रंगमंच विस्तार व तेलुगू,मराठी,हिंदी  भाषेतील रंगमंचीय आंतर भारती नाट्य आविष्कार गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास देशभरातील विविध साहित्यिक,कलावंत,लेखक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या समारंभात पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठाचे अधिकारी,मथुरा काशी आयोध्या येथील विद्वतजन सहभागी झाले होते.

या अविस्मरणीय सोहळ्यात प्रा.अजय दासरी यांनी कृतज्ञता व्यक्त करून आगामी काळात भारतीय नाट्य परंपरा जोपासुन नाट्य कलेतून समाजप्रबोधन करीत नवीन कलावंत निर्माण होतील याची ग्वाही दिली.मंचावरील प्रतिष्ठित प्रतिभावंतांचे डॉ.प्रा.अजय दासरी पुषगुच्छ देवून स्वागत व आभार मानले.


 Give Feedback



 जाहिराती